1
मार्क 6:31
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही.
Compare
Explore मार्क 6:31
2
मार्क 6:4
मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.”
Explore मार्क 6:4
3
मार्क 6:34
जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली.
Explore मार्क 6:34
4
मार्क 6:5-6
काही आजार्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले.
Explore मार्क 6:5-6
5
मार्क 6:41-43
मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.
Explore मार्क 6:41-43
Home
Bible
Plans
Videos