मार्क 6:41-43
मार्क 6:41-43 MRCV
मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.