1
मार्क 5:34
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.”
Compare
Explore मार्क 5:34
2
मार्क 5:25-26
आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती. याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता.
Explore मार्क 5:25-26
3
मार्क 5:29
तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
Explore मार्क 5:29
4
मार्क 5:41
तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”)
Explore मार्क 5:41
5
मार्क 5:35-36
येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.” त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
Explore मार्क 5:35-36
6
मार्क 5:8-9
कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.” “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत.
Explore मार्क 5:8-9
Home
Bible
Plans
Videos