मरकुस भूमिका

भूमिका
मार्कची सुवार्था या घटनेपासून सुरुवात होते, देवाचा पोरगा येशू ख्रिस्ताची सुवार्था. याच्यात येशूले एक अधिकार सम्पन अन् क्रियाशील माणसाच्या रुपात दर्शवलेल हाय. त्याचा अधिकार त्याच्या शिक्षेमध्ये, भुत आत्म्यावर त्याचा अधिकार, अन् लोकायचे पाप क्षमा करण्यात प्रगट झाले हाय. याच्यात येशू स्वताले माणसाचा पोरगा म्हणतो. तो यासाठी आला, लोकायले पापापासून मुक्त करावं.
मार्क येशूचे वचन अन् शिक्षावर नाई पण त्याच्या कार्यावर जोर देते. म्हणून तो त्याच्या कथेला सिधी सरळ अन् प्रभावशाली रुपात प्रगट करते. योहान बाप्तिस्मा देणारा, अन् येशूचा बाप्तिस्मा, अन् त्याच्या परीक्षेविषयी एक लहान भूमिकेच्या बाद लेखक पटकन येशूची चंगाई अन् शिकवण व सेवा कार्याचा वर्णन करते. जसा-जसा वेळ गेला तसा-तसा येशूचे शिष्य त्याले आणखी चांगल्या प्रकारे समजत गेले, पण येशूचे विरोधी आणखी उग्र झाले. आखरीच्या अध्याय मध्ये येशूचे पार्थिव जीवनाच्या आखरी हप्त्याच्या घटनेचे वर्णन प्रस्तुत करतात, ज्याचात प्रमुख, त्याचे वधस्तंभावर चढवल्या जाणे, अन् त्याचे पुनरुत्थान.
रूप-रेखा
सुवार्था ची सुरुवात 1:1-13
गालीलात येशूची जनसेवा 1:14-9:50
गालीलापासून तर यरुशलेम परेंत यात्रा 10:1-52
यरुशलेम मध्ये आखरी हप्ता 11:1-15:47
येशूचे पुनरुत्थान 16:1-8
जिवंत होऊन प्रभूचे दिसणे अन् स्वर्गात वापस जाणे 16:9-20

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan