मत्तय 22:18-22

मत्तय 22:18-22 VAHNT

येशूने त्यायचे कपटपणा वयखुण त्यायले म्हतलं, “हे कपटी लोकायनो तुमी माह्याली परीक्षा कावून पायता, करवसुली चा सिक्का मले दाखवा.” तवा त्यायनं एक दिनार (रोमन सिक्का एका दिवसाची मजुरी) त्याच्यापासी आणला, तवा येशूनं त्यायले म्हतलं, कि “ह्याच्यावर चित्र अन् नाव कोणाचं हाय?” अन् त्यायन म्हतलं कि रोमी सम्राटच. येशूनं त्यायले म्हतलं “जे रोमी सम्राटची वस्तु हाय ते रोमी सम्राटले द्या, अन् जे देवाची वस्तु हाय ते देवाले द्या” हे आयकून ते हापचक झाले, अन् त्याले सोडून चालले गेले.