मत्तय 22

22
लग्नाच्या जेवणाची कथा
(लूका 14:15-24)
1यावर येशू आणखी लोकायले कथेतून सांगायले लागला. 2“स्वर्गाच राज्य ह्या कथेच्या त्या राजा सारखं हाय, ज्याने आपल्या पोराचं लग्न केलं, 3अन् त्यानं आपल्या नौकरायले पाठवलं, कि आमंत्रण देलेल्या लोकायले लग्नाच्या जेवणासाठी बलवावे, पण ते लोकं आले नाई.
4मंग त्यानं अजून नौकरायले हे सांगून पाठवले, कि आमंत्रित लोकायले सांगा, पाहा, मी चवदार जेवण तयार केले हाय, लग्नाच्या जेवणात या. 5पण त्यायनं लक्ष देलं नाई, अन् कोणी आपल्या वावरात अन् कोणी आपल्या व्यापारासाठी चालले गेले. 6अन् जे रायलेले होते त्यायन त्याच्यावाल्या नौकरायले पकडून त्यायच्या अपमान केला अन् मारून टाकलं.
7राजाले लय राग आला, अन् त्यानं आपले सैनिक पाठवून, त्या खूण करणाऱ्यायले मारून टाकलं. अन् त्यायच्या नगरायले अन् गावाले आग लावून नष्ट केलं. 8तवा राज्यानं आपल्या नौकरायले म्हतलं, लग्नाचं जेवण तर तयार हाय, पण आमंत्रणकारी लायकीचे नाई हायत. 9म्हणून, तुमी चौकत जा, अन् रस्त्यावर जेवढे लोकं तुमाले भेटतीन, त्या सगळ्यायले लग्नाच्या जेवणासाठी बलाऊन आणा.
10तवा त्या नौकरायन रस्त्यावर जाऊन, बेकार अन् चांगले जेवढे लोकं भेटले त्या सर्वायले एकत्र केलं, अन् लग्नाचं घर जेवणाऱ्या पाहुण्यान खचाखच भरून गेला.” 11“जवा राजा जेवणाऱ्या पाहुण्यायले पायण्यासाठी अंदर आला, तवा त्यानं ततीसाक एक माणूस पायला, जो लग्नाचे कपडे जे पाहुण्यायले घालायले देले होते, ते घातलेला नाई होता,
12राजानं त्याले विचारलं हे दोस्ता, तू लग्नाचे कपडे न घालता अती कावून आला? पण तो काहीच बोलू शकला नाई. 13तवा राजाने शिपायायले म्हतलं, याचे हात पाय बांधून, त्याले बायर अंधारात टाका, तती फक्त रडणं अन् दात खानं हाय. 14अन् येशूनं उत्तर देलं, बलावलेले लय हायत, पण निवडलेले कमी हायत.”
सम्राटाले करवसुली देण्याबद्दल
(मार्क 12:13-17; लूका 20:20-26)
15तवा परुशी लोकायन जावून आपसात विचार केला, कि येशूले कोणत्या गोष्टीत फसवायच. 16तवा परुशी लोकायन आपल्या सोताच्या शिष्यायले, हेरोद राजाचे समर्थन करणारे लोकाय संग येशू पासी पाठवून म्हतलं “हे गुरुजी, आमाले मालूम हाय, तुमी जे बोलता ते नेहमीच खरं असते, अन् देवाच्या मार्गाची खरी शिकवण देता; अन् तू या गोष्टीले नाई भीत कि लोकं तुह्या बाऱ्यात काय विचार करतात, कावून कि तू लोकायचं तोंड पाऊन नाई बोलत.
17म्हणून आमाले सांग तुले काय वाटते? कि रोमी सम्राटले कर देणं चांगलं हाय कि नाई?” 18-22येशूने त्यायचे कपटपणा वयखुण त्यायले म्हतलं, “हे कपटी लोकायनो तुमी माह्याली परीक्षा कावून पायता, करवसुली चा सिक्का मले दाखवा.” तवा त्यायनं एक दिनार (रोमन सिक्का एका दिवसाची मजुरी) त्याच्यापासी आणला, तवा येशूनं त्यायले म्हतलं, कि “ह्याच्यावर चित्र अन् नाव कोणाचं हाय?” अन् त्यायन म्हतलं कि रोमी सम्राटच. येशूनं त्यायले म्हतलं “जे रोमी सम्राटची वस्तु हाय ते रोमी सम्राटले द्या, अन् जे देवाची वस्तु हाय ते देवाले द्या” हे आयकून ते हापचक झाले, अन् त्याले सोडून चालले गेले.
पुनर्जीवन अन् लग्न
(मार्क 12:18-27; लूका 20:27-40)
23त्याचदिवशी सदुकी लोकं जे हे विश्वास करत होते कि, मेलेल्या लोकायचं परत जिवंत होऊ शकत नाई, ते येशू पासी आले अन् त्याले विचारू लागले. 24कि “हे गुरु, मोशेने म्हणलं होते, जर कोणी बिना लेकराचा मरून जाईन, तर त्याच्या भाऊ त्याच्यावाल्या बायकोच्या संग लग्न करून आपल्या भावाच्या साठी संतती वाढविन,
25तर आमच्या जवळ सात भाऊ होते, तर पयला भाऊ तिच्या संग लग्न करून बिना लेकराचा मरून गेला, अन् लेकरू नसल्याने आपली बायको आपल्या भावासाठी सोडून गेला; 26अशाचं प्रकारे दुसऱ्याने अन् तिसऱ्याने केलं, अन् सातही भावापरेंत असचं झालं, 27अन् त्या सर्वाचा मांगून ते बायको पण मरून गेली; 28जवा ते मेलेले लोकं परत जिवंत होतीन तवा कोणाची बायको होईन, कावून कि ते त्या सर्वाची बायको झाली होती.”
29अन् येशूनं त्यायले म्हतलं, कि “तुमी पवित्रशास्त्र अन् देवाच्या सामर्थ्याले नाई ओयखत म्हणून तुमी चुकता. 30कावून कि मेलेले लोकं परत जिवंत झाल्यावर लग्न करू शकत नाई, ते स्वर्गातल्या देवदूता सारखे असतीन.
31पण काय मेलेले लोकं परत जिवंत होण्याच्या विषयात तुमी पवित्रशास्त्रात नाई वाचले? अब्राहामाचा व इसहाकाचा अन् याकोबाच्या मेल्याच्या लय वेळाच्या बाद देवबापान म्हतलं. 32कि मी अब्राहामाचा देव, अन् इसहाकाचा देव, अन् याकोबाचा देव हावो, तो तर मेलेल्याचा नाई पण जिवंत लोकायचा देव हाय.” 33हे आयकून, लोकं त्याच्या उपदेशाने हापचक झाले.
सगळ्यात मोठी आज्ञा
(मार्क 12:28-34; लूका 10:25-28)
34जवा परुशी लोकायन हे आयकलं, कि त्यानं सदुकी लोकायचं तोंड बंद केले, तवा ते एकत्र झाले अन् येशूच्या पासी आले. 35“त्यायच्यातून मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षकायनं परख्यासाठी, येशूले विचारलं” 36हे गुरु, मोशेच्या नियमशास्त्रात सर्व्यात मोठी आज्ञा कोणती हाय?
37येशूने त्याले म्हतलं, कि “तू देव आपल्या प्रभूवर आपल्या साऱ्या मनाने, अन् साऱ्या जीवाने, अन् आपल्या साऱ्या बुद्धीने प्रेम कर. 38हे पयली अन् सगळ्यात महत्वपूर्ण आज्ञा हाय. 39अन् त्याच्या सारखीच हे दुसरी पण आज्ञा हाय, कि तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सारखच प्रेम कर. 40मोशेचे नियमशास्त्र अन् भविष्यवक्त्यायची पुस्तक या दोन आज्ञा वरच आधारित हाय.”
ख्रिस्त कोणाचा पोरगा
(मार्क 12:35-37; लूका 20:41-44)
41जवा परुशी लोकं एकत्र होते, तवा येशूने त्यायले विचारलं, 42“कि ख्रिस्ताच्या विषयात तुमी काय समजता? कि तो कोणाचा पोरगा हाय?” त्यायन त्याले उत्तर देलं, “ख्रिस्त दाविद राजाचा पोरगा हाय.” 43येशूनं त्यायले विचारलं, “तर मंग दाविद राजा त्याले आत्म्यातून प्रभू कावून म्हणतो?
44देवाने माह्या प्रभूला म्हतलं, कि माह्याल्या उजव्या बाजूनं बस, जोपरेंत मी तुह्याल्या वैऱ्यांना तुह्याल्या पायाखाली करत नाई. 45मंग दाविद राजा स्वता येशूला ख्रिस्त म्हणतो तर मंग तो त्याचा पोरगा कसा काय होईन?” 46तवा कोणी पण त्याले एक शब्द पण उत्तर देलं नाई, अन् त्या दिवसापासून कोणाले पण त्याले काई विचारायची हिम्मत झाली नाई.

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan