मत्तय 14

14
हेरोद येशूच्या बाऱ्यात आयकते
(मार्क 6:14-29; लूका 9:7-9)
1अन् त्यावेळी हेरोद राजाने येशूच्या कामाच्या बाऱ्यात आयकलं. 2अन् तवा त्यानं आपल्या सेवकायले म्हतलं, “हा योहान बाप्तिस्मा देणारा हाय, जो मेलेल्यातून जिवंत झाला हाय, म्हणून तो चमत्काराचे काम करतो.”
योहानची हत्या
3कावून की हेरोद राजानं आपला सक्का भाऊ फिलिप्पुस, याची बायको हेरोदियास संग लग्न केलं होतं, तिच्यामूळ योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले पकडून बांधलं अन् जेलात टाकून देलं होतं. 4कावून की योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान हेरोद राजाले म्हतलं होतं की तू आपल्या भावाची बायको संग कायले लग्न केलं, हे नियमाच्या विरुध्य हाय.
5म्हणून राजा हेरोद त्याले मारून टाकण्याचा प्रयत्नात होता. पण तो लोकायले भेत होता, कावून कि लोकं त्याले भविष्यवक्ता समजत होते. 6अन् एक दिवस जवा हेरोद राजाचा वाढदिवस आला तवा हेरोदियासच्या पोरीनं त्या कार्यक्रमात स्वता अंदर जाऊन नाच केला अन् हेरोद राजाले खुश केलं. 7म्हणून हेरोद राजानं तिले शपत खाऊन वचन देलं, कि “जे काई तू मांगसीन, ते मी तुले देईन.”
8अन् तिने आपल्या मायच्या शिकवल्याप्रमाणे म्हतलं, “मले तुमी योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं मुंण्डक ताटात, आताच्या आता आणून द्या.” 9तवा राजाले लय दुख वाटलं, पण त्यानं देलेल्या शपतीच्यान अन् जेवणाले बसलेल्या लोकायच्यानं, त्याले म्हणा करता आलं नाई. 10अन् राजाने जेलात शिपायानले पाठवून, जेल खान्यातून योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं मुंण्डक कापून आन्याले सांगतल.
11अन् शिपायायनं त्याचं मुंण्डक ताटात आणलं, अन् हेरोद राजाच्या पोरीले देऊन देलं, अन् ते तिच्या मायच्या पासी घेऊन गेली. 12तवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे शिष्य आले अन् त्याचं मेलेलं शरीर उचलून मसाणखाईत नेऊन दाबलं. अन् जाऊन येशूला त्याच्या बाऱ्यात सांगतल.
पाच हजार लोकायले जेवण देनं
(मार्क 6:30-44; लूका 9:10-17; योहान 6:1-14)
13हे झाल्यावर जवा येशूने योहानाच्या बाऱ्यात आयकलं, तवा तो डोंग्यात चढून गालील समुद्राच्या काटावर जाऊन तिकळल्या बाजूनं एका शांत सुनसान जागी चालला गेला, अन् लोकं हे आयकून कि येशू कुठं गेला गाव-गावातून त्याच्या मांग पाई-पाई निघाले. 14येशू डोंग्यातून उतरल्यावर त्याले एक मोठी गर्दी दिसली, अन् येशूला त्यायच्यावर दया आली, अन् त्यानं सगळ्या लोकायच्या बिमारीले चांगलं केलं.
15त्याचं दिवशी जवा दिवस डुबून रायला होता, तवा येशूचे शिष्य त्याच्यापासी आले, अन् म्हतलं “हे सुनसान जागा हाय अन् दिवस लय डुबला हाय. त्या लोकायले जाऊ दे, की ते आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाऊन, आपआपल्या साठी खायाले, काई विकत घेतील.” 16पण येशूनं त्यायले म्हतलं कि, “त्यायचं जाणं जरुरी नाई, तुमीच त्यायले जेव्याले द्या.”
17पण शिष्यायनं त्याले म्हतलं कि, “अती आमच्यापासी पाच भाकरी अन् दोन मासोया शिवाय अजून काई नाई.” 18तवा येशूनं त्यायले म्हतलं, “माह्यापासी घेऊन या.” 19तवा त्यानं लोकायले गवतात बशाले सांगतल, अन् त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेतल्या, अन् स्वर्गाच्या इकडे पावून देवाचा धन्यवाद केला, अन् भाकरी तोडून-तोडून शिष्यायले देल्या, अन् शिष्यायनं लोकायले खायाले देल्या. 20जवा ते खाऊन तृप्त झाले तवा शिष्यायनं उरलेल्या भाकरीच्या तुकड्याईचे भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या. 21अन् जेवणारे बाया अन् लेकरं सोडून जवळपास पाच हजार माणसं होते.
येशूचे पाण्यावर चालणे
(मार्क 6:45-52; योहान 6:16-21)
22तवा येशूनं लवकरच आपल्या शिष्यायले डोंग्यात चढण्यासाठी सांगतल, कि ते त्याच्या पयले दुसऱ्या किनाऱ्यावर चालले जावो, जवा परेंत तो लोकायले घरी पाठवून देतो. 23-24मंग येशू लोकायले निरोप देऊन प्रार्थना कराले पहाडावर गेला, अन् संध्याकायच्या वाक्ती तो एकटा होता, तवा शिष्यायचा डोंग्यात समुद्राच्या मधात हालून रायला होता, कावून कि हवा त्यायच्या समोरून होती. 25अन् येशू एकदम सकाळी पाण्यावर चालत, त्यायच्यापासी गेला.
26शिष्य त्याले पाण्यावर चालत असतांना पाऊन घाबरून गेले, अन् म्हणू लागले, कि “हा भुत हाय” अन् भेवाच्या माऱ्यान कल्ला करू लागले होते. 27तवा येशू लवकरच त्यायच्या संग बोलला, अन् म्हतलं, “हिम्मत धरा, मी येशू हावो, भेऊ नका.” 28पतरसने त्याले उत्तर देलं कि, “हे प्रभू, जर येशूच हायस तर मले आपल्यापासी पाण्यावर चाल्याची आज्ञा दे.” 29येशूनं त्याले म्हतलं “ये” तवा पतरस डोंग्यातून उतरून येशूच्या पासी जाण्यासाठी पाण्यावर चालू लागला.
30पण प्रचंड वाऱ्याले पाऊन भेला, अन् तो डुबायले लागला तवा त्यानं जोऱ्याने आवाज देऊन म्हतलं कि “हे प्रभू मले वाचव.” 31येशूने लवकर हात समोर करून त्याचा हात पकडला, अन् त्याले पाण्यातून बायर काढलं, अन् त्याले म्हतलं कि “हे अल्पविश्वासी तू कायले शंका केली?” 32अन् जवा ते दोघं डोंग्यावर चढले तवा हवा थांबली. 33यावर जे डोंग्यात होते, त्यायनं येशू पासी येऊन त्याले नमन करून अन् गौरव करून म्हतलं, “तू खरोखर देवाचा पोरगा हायस.”
येशूच्या द्वारे गनेसरेत नगरातल्या खूप लोकायले बरं करणे
(मार्क 6:53-56)
34तवा येशू अन् त्याचे शिष्य गालील समुद्राच्या पलीकडे उतरून गनेसरेत नगरात पोचले. 35ततच्या लोकायन येशूले वयखलं, अन् आसपासच्या बऱ्याचं नगरात त्याचा समाचार देला अन् लोकायन बऱ्याचं बिमार लोकायले त्याच्यापासी बरं व्हायले आणलं. 36अन् ते लोकं येशूले विनंती करत होते, कि त्यायले फक्त त्याच्या कपड्यालेच हात लाऊ द्यावा, अन् जेवड्यायन त्याले हात लावला ते सगळे चांगले झाले.

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan