लुका 24
24
येशूच जिवंत होणं
(मत्तय 28:1-10; मार्क 16:1-8; योहान 20:1-10)
1पण हपत्याच्या पयल्या दिवशी#24:1 हपत्याच्या पयल्या दिवशी रविवार दिवशी मोठ्या सकाळी त्या सुगंधित वस्तु ज्या तयार केल्या होत्या, त्या बाया अन् दुसऱ्या बाया सोबत घेऊन कब्रेवर आल्या. 2अन् त्यायनं त्या मोठ्या गोल आकाराच्या गोट्याले कब्रेऊन लोटलेला पायलं. 3अन् अंदर जाऊन प्रभू येशूच शरीर दिसलं नाई. 4जवा ते या गोष्टीवर हापचक होऊन रायल्या होत्या, तवा दोन माणसं चमचमीत कपडे घालून त्यायच्यापासी येऊन उभे झाले. 5तवा त्या भेल्या, अन् जमिनीकळे मान खाली करून रायल्या, तवा त्या देवदूतायन त्यायले म्हतलं, कि “तुमी जीत्याले मेलेल्यात कायले पायता. 6तो अती नाई हाय, पण जिवंत झाला हाय, आठवण करा कि त्यानं गालील प्रांतात रायतांना तुमाले काय म्हतलं होतं. 7निश्यय हाय, कि मी, माणसाचा पोरगा पापी लोकायच्या हाती पकळल्या जाईन अन् वधस्तंभावर चढवल्या जाईन अन् तिसऱ्या दिवशी जिवंत होईन.” 8तवा त्याच्या त्या गोष्टी त्यायच्या ध्यानात आल्या. 9अन् कब्रेहुन वापस येऊन त्यायनं त्या अकरा शिष्यायले अन् दुसऱ्या सगळ्यायले ह्या गोष्टी सांगतल्या. 10ज्यायनं प्रेषितायले ह्या गोष्टी सांगतल्या, ते मगदला गावची मरिया, योहान्ना अन् याकोबची माय मरिया अन् त्यायच्या संगच्या दुसऱ्या बाया पण होत्या. 11पण त्यायच्या गोष्टी प्रेषितायले कथे सारख्या वाटल्या अन् त्यायनं त्याच्यावर विश्वास नाई केला. 12तवा पतरस उठून कब्रेवर पयत गेला, अन् कबरेत वाकून पायलं तवा त्याले फक्त कपडे वेगळे पडलेले दिसले, अन् ते पाऊन तो हापचक झाला, अन् आपल्या घरी चालला गेला.
इमाउसच्या रस्त्यात शिष्यायले दर्शन
(मार्क 16:12-13)
13त्याचदिवशी येशूचे दोन शिष्य इमाउस नावाच्या गावात चालले होते, जो यरुशलेम शहरापासून सात कोस (जवळपास अकरा किलोमीटर) दूर होते. 14अन् त्या सगळ्या झालेल्या घटनेच्या बाऱ्यात आपसात गोष्टी करून जाऊन रायले होते. 15अन् जवा ते आपसात गोष्टी अन् विचारपूस करूनच रायले होते, तवा येशू स्वता त्यायच्यापासी येऊन त्यायच्या संग चालत होता. 16तरी पण देवानं त्यायचे डोये असे बंद केले होते, कि त्यायनं त्याले ओयखलं नाई पायजे. 17येशूनं त्यायले विचारलं, कि “ह्या कोणत्या गोष्टी हाय जे तुमी रस्त्यान चलता-चलता एक-दुसऱ्या संग करून रायले हा?” अन् ते थांबले अन् त्यायचे तोंड उदास दिसत होते. 18हे आयकून, त्यायच्यातून क्लियुपास नावाच्या एका माणसानं म्हतलं, “तू यरुशलेम शहरात एकटाचं बायरचा माणूस हाय वाटते, जे तुले नाई माहीत कि मांगच्या काई दिवसात काय-काय झालं हाय.” 19येशूनं त्यायले विचारलं, कि “कोणत्या गोष्टी?” त्यायनं त्याले म्हतलं “नासरत नगरचा येशूच्या विषयात जो देवाचा अन् सगळ्या लोकायच्या जवळ काम अन् वचना मधी सामर्थी भविष्यवक्ता होता. 20अन् मुख्ययाजकायन अन् आमच्या सरदारायन त्याले पकडून देलं, कि त्याच्यावर मरण दंडाची आज्ञा देली पायजे, अन् त्याले वधस्तंभावर टांगलं पायजे. 21पण आमाले आशा होती, कि हाचं इस्राएल देशाले रोमी साम्राज्या पासून मुक्त करणार, अन् या गोष्टीले सोडून या घटनेले होऊन तिसरा दिवस हाय. 22अन् आता आमच्यातून काई बायायन आमाले आश्चर्यात टाकलं हाय, ज्या आज सकाळीच कब्रेवर गेल्या होत्या. 23अन् जवा त्याचं शरीर नाई सापडलं, तवा असं म्हणत आल्या, कि आमाले देवदूताचं दर्शन झालं, त्यायनं म्हतलं कि येशू जिवंत हाय. 24तवा आमच्या दोस्तायतून काई लोकं कब्रेकडे गेले, अन् जसं बायायन म्हतलं होतं, तसचं पायलं, पण त्याले नाई पायलं.” 25तवा त्यायले त्यानं म्हतलं, कि “हे मूर्ख लोकायनो जे काई भविष्यवक्त्यायनं पवित्रशास्त्रात लिवलं हाय तुमी लोकायले त्याच्यावर विश्वास ठेवणे लय कठीण वाटते. 26हे आवश्यक होतं कि ख्रिस्त हे सगळे दुख उचलणार अन् मंग आपल्या गौरवात प्रवेश करणार.” 27तवा येशूनं मोशेच्या नियमशास्त्रातून अन् सगळ्या भविष्यवक्ताय पासून सुरुवात करून सगळ्या पवित्रशास्त्रातून आपल्या विषयात केलेल्या गोष्टीचा अर्थ त्यायले समजवून सांगतला.
28एवढ्यात ते त्या गावच्या पासी पोचले जती ते चालले होते, अन् त्यायच्या बोलण्यातून असं मालूम पडलं, कि त्याले पुढे जायची इच्छा हाय. 29पण त्यायनं त्याले हे म्हणून थांबवलं, कि आमच्या संग राय; कावून कि संध्याकाळ होऊन रायली, अन् दिवस आता लय डुबला हाय; तवा तो त्यायच्या संग रायला. 30जवा तो त्यायच्या संग जेवाले बसला, तवा त्यानं भाकर घेऊन धन्यवाद देला, अन् तिले तोडून त्यायले देऊ लागला. 31तवा त्यायचे डोये उघडले अन् त्यायनं त्याले ओयखलं, अन् तो त्यायच्या डोयाच्या समोरून गायप झाला. 32त्यायनं आपसात म्हतलं, “जवा तो रस्त्यानं आपल्या संग गोष्टी करून रायला होता, अन् पवित्रशास्त्रातला अर्थ आपल्याले समजवून रायला होता, तवा काय आपल्या मनात प्रोत्साहन उत्पन्न नाई झालं?” 33ते तवाच उठून यरुशलेम शहरात चालले गेले, अन् त्या अकरा शिष्यायले अन् त्यायच्या दोस्तायले एकत्र पायलं. 34ते त्यायले म्हणायले लागले, कि “प्रभू खरचं जिवंत झाला हाय, अन् शिमोन पतरसले दिसून आला.” 35तवा त्यायनं रस्त्यावर झालेल्या सगळ्या गोष्टी त्यायले सांगतल्या अन् हे पण त्यायले सांगतल कि त्यायनं त्याले भाकर मोडायच्या वाक्ती कसं ओयखलं.
येशूच आपल्या शिष्यायवर प्रगट होणं
(मत्तय 28:16-20; मार्क 16:14-18; योहान 20:19-23; प्रेषित 1:6-8)
36जवा तो हे गोष्टी सांगूनचं रायला होता, कि येशू स्वताच त्यायच्या मधात प्रगट झाला, अन् त्यायले म्हतलं, कि “तुमाले शांती मिळो.” 37पण ते घाबरून गेले, अन् भेले, अन् त्यायले असं वाटलं, कि ते कोण्या भुताले पावून रायले होते. 38येशूनं त्यायले म्हतलं, कि “कावून भेऊन रायले? अन् तुमच्या मनात कावून शंका होऊन रायली हाय? 39माह्या हाताले अन् माह्या पायाले पाहा, मी तोच हावो, मले हात लाऊन पाहा, कावून कि भुतायले हड्डी अन् मांस नसते, जसं माह्यात पाऊन रायले आहा.”
40हे म्हणून त्यानं त्यायले आपले हात पाय दाखवले. 41जवा आनंदा मुळे त्यायले विश्वास होतं नव्हता, कि येशू जिवंत हाय, अन् आश्चर्य करत होते, तवा येशूनं त्यायले विचारलं, “काय अती तुमच्यापासी काई जेवण हाय?” 42त्यायनं त्याले भाजलेल्या मासोईचा तुकडा देला. 43त्यानं घेऊन तो त्यायच्या समोर खालला. 44मंग त्यानं त्यायले म्हतलं, कि “हे माह्या त्या गोष्टी हायत ज्या मी तुमच्या संग रायतांना तुमाले सांगतल्या होत्या, आवश्यक हाय कि जेवड्या गोष्टी मोशेच्या नियमशास्त्रात अन् भविष्यवक्ताच्या अन् स्तोत्राच्या पुस्तकात, जे माह्या विषयात लिवलेल हाय सर्व पूर्ण होणं आवश्यक हाय.” 45तवा त्यानं पवित्रशास्त्र समजाले पायजे म्हणून त्यायची मदत केली. 46अन् त्यायले म्हतलं, “हे लिवलेल हाय, कि हे आवश्यक होतं कि ख्रिस्ताला दुख भोगावे लागीन, अन् तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत होईन. 47अन् यरुशलेम शहरापासून अन्यजातीत पापापासून मन फिरवाचा अन् पाप क्षमाचा संदेश त्याच्याच नावानं प्रचार केल्या जाईन. 48तुमी या सगळ्या गोष्टीचे साक्षी हा. 49अन् ज्याची प्रतिज्ञा माह्या देवबापान केली होती, मी स्वता देवाच्या आत्म्याले तुमच्यावर पाठवीन, ज्याची शपत माह्या देवबापाने केली हाय; अन् जोपर्यंत स्वर्गातून सामर्थ नाई भेटीन तोपर्यंत तुमी त्याचं यरुशलेम शहरात थांबून राहा.”
येशूची स्वर्गात वापसी
(मार्क 16:19-20; प्रेषित 1:9-11)
50येशू त्यायले बेथानी गावा परेंत शहराच्या बायर घेऊन गेला, अन् आपले हात वर करून त्यायले आशीर्वाद देला. 51अन् त्यायले आशीर्वाद देतांना तो त्यायच्या पासून अलग झाला, अन् स्वर्गात घेतल्या गेला. 52अन् ते त्याची आराधना करून मोठ्या आनंदाने यरुशलेम शहरात वापस आले. 53अन् ते हरवेळी यरुशलेमच्या देवळात येऊन देवाचा गौरव करत होते, धन्य म्हणत होते.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.