लुका 15

15
हारपलेल्या मेंढराची कथा
(मत्तय 18:12-14)
1एक दिवस सगळे जकातदार अन् पापी लोकं येशू पासी त्याच्या शिकवणीले आयक्याले येऊन रायले होते. 2तवा परुशी अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं कुरकुर करून म्हणाले लागले, “हा तर पापी लोकायच्या संग भेटते अन् त्यायच्या संग जेवते.” 3मंग त्यानं त्यायले ही कथा सांगतली. 4“तुमच्याईतून असा कोणता माणूस हाय ज्याचे शंभर मेंढरं हायत अन् त्यातून एक मेंढरू हारपलं तर तो नव्याणीव मेंढरं सुनसान जागी सोडून देऊन, त्या हारपलेल मेंढरू जोपर्यंत ते सापडत नाई तोपर्यंत, त्याचा शोध करत राईन? 5अन् जवा ते मेंढरू सापडते तवा त्याले तो मोठ्या आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेते. 6अन् घरी येऊन दोस्तायले अन् शेजारच्यायले एखट्टा करून बलावून म्हणते, माह्या संग आनंद करा, कावून कि माह्यावालं हारपलेल मेंढरू मले सापडलं हाय. 7मी तुमाले सांगतो, ह्याच प्रमाणे एक पश्चाताप करून देवा जवळ येणाऱ्या पापीच्या विषयात स्वर्गात एवढाच आनंद केला जाईन, जेवढा नव्यानव धर्मी माणसाच्या बद्दल केला जाणार नाई, ज्यायले पश्चातापाची गरज नाई.”
हारपलेल्या शिक्याची कथा
8येशूनं आणखी एक कथा सांगून म्हतलं, “कोणती अशी बाई अशीन, जिच्या पासी दहा चांदीचे सिक्के असून त्याच्यातून जर एक सिक्का हारपला, तवा ती दिवा लाऊन व घर झाळून ते सापडे परेंत जीव लावून पाह्यतं रायते, जतपरेंत तिले सिक्का सापडत नाई? 9अन् जवा तिले सापडते तवा ते बाई आपल्या मैत्रीनीले अन् शेजारीणलें एखट्टा बलावून म्हणते, हा सिक्का हारपला होता तो मले सापडला, म्हणून माह्याल्या संग आनंद करा. 10मी तुमाले सांगतो, ह्याच प्रकारे पापापासून मन फिरवून देवाकडे येणाऱ्या एक पापी माणसाच्या बाऱ्यात देवदूत पण आनंद करतात.”
उडाऊ पोराची कथा
11मंग येशूनं अजून एक कथा सांगतली, “एका माणसाचे दोन पोरं होते. 12त्याच्यातून लायण्यान आपल्या बापाले म्हतलं, बाबा, मालमत्तेचा जो काई वाटा माह्याला हाय, तो मले देऊन द्या, तवा बापानं आपली सगळी संपत्ती दोन पोरायले वाटून देली. 13अन् काई दिवसानंतर तोच लायना पोरगा, आपली काई संपत्ती इकून, दूरच्या देशात गेला, अन् तती मौजमजेत आपले सगळे पैसे गमावून टाकले. 14जवा त्यानं सगळे पैसे खर्च करून टाकले, तवा त्या देशात मोठा दुष्काळ पडला, अन् तो पूर्ण कंगाल झाला. 15तवा तो तितच्या एका रायनाऱ्या माणसा जवळ काम कराले गेला, त्या माणसानं त्याले वावरात डुकरं चाऱ्यालें पाठवलं. 16अन् तो एवढा उपासी होता, कि तो पोट भरण्यासाठी ते जेवण खाण्यासाठी इच्छुक होता, जे डुकरं खात होते, पण त्याले कोणीचं काई देत नाई होते. 17जवा तो शुद्धीवर आला, अन् हा विचार कऱ्याले लागला, माह्या बापाच्या घरी मजुरायले लय जेवण मिळते पण मी अती भूकीनं मरून रायलो हाय. 18मी आता उठून आपल्या बापाच्या पासी जाईन अन् म्हणीन, बाबा मी स्वर्गाच्या देवाच्या विरोधात अन् तुह्या विरोधात पाप केलं हाय. 19म्हणून मी ह्या योग्य पण नाई, कि तुह्यावाल्या पोरगा व्हावं, पण मले आता एका मजूरां सारखं ठेव.”
उडाऊ पोराचे वापस येणे
20“तवा तो उठला अन् तो देश सोडून आपल्या बापाच्या पासी वापस याले निघाला, अन् जवा तो दूरचं होता, तवा त्याच्या बापाले त्याले पाऊन तरस आला, अन् त्याच्याकडे पयत जाऊन त्याच्या गयात मिठी मारली अन् मुके घेऊ लागला. 21तवा पोरानं बापाले म्हतलं, बाबा मी स्वर्गाच्या देवाच्या अन् तुह्या विरोधात पाप केलं हाय, म्हणून आता मी तुह्या पोरगा व्हावं ह्या योग्य पण नाई. 22पण बापानं आपल्या दासांना म्हतलं, लवकर जाऊन चांगले कपडे काढून त्याले घाला, अन् त्याच्या हातात आंगठी अन् पायात जोडे घाला. 23अन् मोठी पंगत ठेवा, आपण खाऊ अन् हर्ष आनंद करू, 24कावून कि हा माह्यावाला पोरगा पयले मेलेल्या सारखा होता, परत जिवंत झाला हाय, हारपला होता, आता सापडला हाय, तवा ते सरेझण हर्ष आनंद करू लागले.”
मोठ्या पोराची तक्रार
25“त्यावाक्ती त्याच्या मोठा पोरगा वावरात काम करत होता, अन् जवा तो घराच्या जवळ पोचला, तवा त्यानं गाणं गायाच्या अन् नाच्याचां आवाज आयकला. 26तवा त्यानं नौकराय पैकी एकाले बलावून विचारलं, हे काय चालू हाय. 27तवा त्यानं त्याले म्हतलं, तुह्यावाला भाऊ घरी वापस आला हाय, अन् तुह्या बापानं ह्या साठी मोठी पंगत ठेवली हाय कावून कि तो सुखरूप घरी आला. 28हे आयकून त्याले राग आला, अन् घराच्या अंदर गेला नाई, तवा त्याच्या बाप बायर येऊन त्याले घराच्या अंदर यासाठी समजाऊ लागला. 29पण त्यानं त्याच्या बापाले उत्तर देऊन म्हतलं, पाह्य मी कईक वर्षापासून तुह्यावाली सेवा करून रायलो हाय, अन् कधी पण तुह्यी आज्ञा तोडली नाई, तरी पण तू माह्यासाठी कधी पण काईच चांगली वस्तु नाई देली, कि मी माह्याल्या दोस्ताय संग आनंद करू. 30पण जवा तुह्याला हा पोरगा, ज्यानं तुह्याली संपत्ती वेश्याईत गमावून टाकली, घरी वापस आला, म्हणून त्याच्यासाठी तू लय चवदार जेवण मोठी पंगत तयार केलं हाय. 31तवा त्यानं त्याले म्हतलं, पोरा तू तर नेहमी माह्या संग हायस; अन् जे काई माह्य हाय हे तुह्यालचं हाय. 32पण आता हर्ष आनंद कराले पायजे, कावून कि हा तुह्या भाऊ मेल्यासारखा होता, अन् तो परत जिवंत झाला हाय, हारपलेला होता, पण आता सापडला हाय.”

目前选定:

लुका 15: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录