युहन्ना 8
8
व्यभिचारणी बाईला क्षमा करणे
1येशू जैतून पहाडावर#8:1 जैतून पहाडावर यरुशलेम शहराच्या पूर्व भागात एक पहाड होता, त्याचं नाव जैतूनच्या झाडाच्या कारणाने ठेवण्यात आले होते गेला. 2मंग दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळीच तो यरुशलेम शहराच्या देवळाच्या आंगणात आला, अन् लय लोकं त्याच्यापासी आले; तो बसला, अन् त्यायले शिकवण देऊ लागला. 3जवा तो बोलत होता, तवा मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनं अन् परुशी लोकायन, एका बाईले आणलं, जी व्यभिचार मध्ये पकडल्या गेली होती, अन् त्यायनं तिले लोकायच्या गर्दी समोर उभं करून येशूले म्हतलं, 4“हे गुरुजी, हे बाई व्यभिचार करतांना पकडल्या गेली हाय. 5मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुसार आमाले आज्ञा मिळाली हाय, कि अश्या लोकायले मारून टाकण्यासाठी त्यायले गोटे मारावे; तर मंग तू काय म्हणतो, कि आमाले काय कराले पायजे?” 6त्यायनं येशूले परख्यासाठी हे गोष्ट म्हतली, कि त्याच्यावर दोष लाव्यासाठी कोणत कारण भेटलं पायजे, पण येशू फक्त खाली वाकला अन् आपल्या बोटान जमिनीवर लिव्याले लागला. 7जवा ते त्याले विचारत रायले, तवा त्यानं सरळ उभं राऊन त्यायले म्हतलं, “तुमच्यातून ज्यानं कधीच पाप नाई केलं हाय, तोच पयले तिले गोटा मारीन.” 8अन् परत खाली वाकून जमिनीवर बोटान लिव्याले लागला. 9पण ते लोकं हे आयकून मोठ्या पासून तर लायण्या परेंत हे जाणून कि ते पापी हाय, एक-एक करून निघून गेले, अन् येशू एकटाचं रायला, त्या बाई संग जी आता पण ततीच उभी होती. 10येशूनं सरख होऊन त्या बाईले म्हतलं, “हे बाई, ते कुठसा गेले? काय कोण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देली?” 11तीन म्हतलं, “हे प्रभू, कोणीचं नाई.” येशूनं म्हतलं, “मी पण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देत; आता घरी चालली जाय, अन् सामोर पापात जीवन नको जगू!”
येशू जगाचा ऊजीळ
12मंग येशूनं परत लोकायले म्हतलं, “जगाचा ऊजीळ मी हाव; जो कोणी माह्या मांग येऊन माह्या शिष्य बनीन, तो अंधारात नाई चालन, पण त्याले तो ऊजीळ भेटन जो अनंत जीवन हाय.” 13परुशी लोकायन त्याले म्हतलं; “तू स्वता आपली साक्ष देत हाय; तुह्या गोष्टी खऱ्या नाई, कावून कि तू फक्त आपलाच गौरव करते.” 14येशूनं त्यायले उत्तर देलं, “जर मी आपली साक्ष स्वता देतो, तरी पण माह्यी साक्ष खरी हाय, कावून कि मले माईत हाय, कि मी कुठून आलो हाय अन् कुठी जात हाय, पण तुमाले नाई माईत कि मी कुठून येत हाय या कुठी जात हाय. 15तुमी माणसाच्या नजरीने न्याय करता; मी कोणाचा न्याय नाई करत. 16अन् जर मी न्याय जरी करीन, तरी पण माह्या न्याय खरा हाय; कावून कि मी एकटा नाई, पण माह्या देवबापा, ज्यानं मले पाठवलं हाय तो माह्या सोबत हाय. 17अन् मोशेच्या नियमशास्त्रात लिवलेल हाय; कि दोन लोकायची साक्षी मिळून खरी रायते. 18एक तर मी स्वता आपली साक्षी देत हाय, अन् दुसरा माह्या देवबाप माह्यी साक्षी देते ज्यानं मले पाठवलं.” 19त्यायनं येशूले म्हतलं, “तुह्या बाप कुठसा हाय?” येशूनं उत्तर देलं, “तुमी मले नाई ओयखत, अन् माह्या देवबापाले पण नाई ओयखत, जर मले ओयखलं असतं तर माह्या देवबापाले पण ओयखलं असतं” 20ह्या गोष्टी त्यानं देवळाच्या आंगणात उपदेश देतांनी भंडार घरात म्हतली, अन् कोणच त्याले नाई पकडलं; कावून कि त्याचा दुख उचलाचा अन् मऱ्याचा वेळ आतापरेंत नाई आला होता.
स्वताचा बाऱ्यात येशूचे कथन
21त्यानं मंग त्यायले म्हतलं, “मी जात हाय, अन् तुमी मले पायसान, अन् तुमी आपले पाप क्षमा झाल्या शिवायचं मरसान; जती मी जातो, तती तुमी नाई येऊ शकत.” 22याच्यावर यहुदी पुढाऱ्यायन म्हतलं, “काय तो स्वताले मारून टाकीन, जो म्हणते, जती मी जातो, तती तुमी नाई येऊ शकत?” 23त्यानं त्यायले म्हतलं, “तुमी अती या संसारात जन्मले होते, पण मी स्वर्गातून आलो हाय; तुमी संसाराचे हा, मी संसाराचा नाई. 24म्हणून मी तुमाले म्हतलं, कि तुमी आपले पाप क्षमा झाल्या शिवाय मरसान; जर तुमी माह्यावर विश्वास नाई करसान, कि मी तोचं हाय तर तुमी मारसान अन् तुम्हचे पाप क्षमा नाई केले जाईन.” 25यहुदी पुढाऱ्यायन त्याले विचारलं, “तू कोण हाय?” येशूनं त्यायले म्हतलं, “मी तोच हाय जवा पासून उपदेश देनं सुरु केलं हाय, तुमाले सांगत आलो हाय कि मी कोण हाय. 26तुमच्या विषयात मले बरेचं काई सांगायच हाय, अन् तुमाले दोषी ठरवण्यासाठी लय सारे हाय, पण माह्या पाठवणारा खरा हाय; अन् जे मी त्याच्यापासून आयकलं हाय, तेच जगातल्या लोकायले सांगतो.” 27ते नाई समजले कि तो आमाले देवबापाच्या विषयात सांगते. 28तवा येशूनं त्यायले म्हतलं, “जवा तुमी मले, माणसाच्या पोराले वधस्तंभावर चढवान, तवा तुमाले माईत होईन कि मी तोच हाय, अन् आपल्या स्वताच्या इच्छेन काहीच नाई करत, पण जसं माह्या देवबापान मले शिकवलं, तसचं ह्या गोष्टी म्हणतो. 29मले पाठवणारा माह्या संग हाय; त्यानं मले एकटं नाई सोडलं; कावून कि मी नेहमी तेच काम करतो, ज्याच्यापासून तो प्रसन्न होते.” 30तो हे गोष्टी सांगूनच रायला होता, कि लय लोकायन येशूवर विश्वास केला.
सत्य तुमाले स्वतंत्र करेन
31तवा येशूनं त्या यहुदी पुढाऱ्यायले ज्यायनं त्याच्यावर विश्वास केला होता, म्हतलं, “जर तुमी माह्या वचनाचे पालन करसान, तर माह्ये खरे शिष्य होसान. 32अन् तुमी खऱ्याला ओयखसान, तर खरं तुमाले आजाद करून देईन!” 33त्यायनं त्याले उत्तर देलं, “आमी तर अब्राहामच्या वंशातले हावो, अन् कधी पण कोणाचे दास झालो नाई; मंग तू कसा म्हणतो, कि तुमी आजाद होऊन जासान?” 34येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी पाप करते, तो पापाच्या गुलामीत हाय. 35अन् दास नेहमी घरी रायत नाई; पोरगा नेहमी रायते. 36म्हणून जर देवाचा पोरगा तुमाले आजाद करीन, तर खरचं तुमी स्वतंत्र होसान. 37मले मालूम हाय, कि तुमी अब्राहामाच्या वंशातले हा; तरीही माह्य वचन अनुसरण करत नाई, म्हणून तुमी मले मारून टाक्याचा प्रयत्न करता. 38मी त्या गोष्टीला सांगतो, ज्या मी पायल्या, जवा मी आपल्या बापाच्या सोबत होतो; अन् तुमी तेच करता जे आपल्या बापापासून आयकलं.” 39त्यायनं त्याले उत्तर देलं, “आमचा पूर्वज अब्राहाम हाय” येशूनं त्यायले म्हतलं, “जर तुमी अब्राहामाच्या खानदानीतले असते, तर अब्राहामासारखे काम केले असते. 40पण तुमी आता मले मारून टाक्याचे प्रयत्न करता, ज्याने तुमाले खरं वचन सांगतलं, जे देवापासून आयकलं, असं तर अब्राहामाने नाई केलं होतं. 41तुमी आपल्या बापा सारखं काम करता” त्यायनं त्याले म्हतलं, “आमी व्यभिचारान नाई जन्मलो. आमचा एकच बाप हाय म्हणजे देव.” 42येशूनं त्यायले म्हतलं, “जर देव तुमचा बाप असता तर तुमी माह्यावर प्रेम ठेवलं असतं; कावून कि मी देवा कडून आलो हाय, मी स्वताच्या इच्छेन नाई आलो, पण त्यानचं मले पाठवलं. 43जे गोष्ट मी म्हणतो ते तुमी नाई समजत, कारण तुमी माह्य वचन आयक्याले म्हणा करता. 44तुमी तुमचा बापा सैतानापासून हा अन् आपल्या बापाच्या लालसा पूर्ण कऱ्याची इच्छा ठेवता, तो तर सुरवाती पासूनच खुनी हाय, अन् त्याचे खऱ्या संग काई देणे घेणे नाई, कावून कि खरं त्याच्यात हायेच नाई; जवा तो खोटं बोलते, तवा आपल्या स्वभावानेच बोलते; कावून कि तो खोटा हाय, अन् खोट्याचा बाप हाय, 45पण मी जे खरं बोलतो तुमी माह्या विश्वास नाई करत. 46तुमच्यातून कोण मले पापी म्हणून आरोप लावते? अन् जर मी खरं बोलतो तर तुमी माह्या विश्वास कावून नाई करत? 47जो कोणी देवा सोबतसंबंध ठेवते, तो देवाच्या गोष्टी आयकते; अन् तुमी याच्यासाठी नाई आयकतं कावून कि तुमी देवाचे नाई हा.”
येशू अन् अब्राहाम
48हे आयकून यहुदी पुढाऱ्यायन त्याले म्हतलं, “आमचं म्हणनं बरोबर होतं, कि तू एक सामरी प्रांताचा माणूस हाय अन् तुह्यात भुत आत्मा हाय.” 49येशूनं उत्तर देलं, “माह्यात भुत आत्मा नाई; पण मी आपल्या बापाचा आदर करतो, अन् तुमी माह्या अपमान करता. 50मले स्वतासाठी आदर नाई पायजे. पण एक हाय ज्याले वाटते कि मले आदर भेटला पायजे, अन् तो तोच हाय जो न्याय पण करते. 51मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जर कोणी माणूस माह्या वचनाच पालन करते, तर तो कधी नाई मरणार.” 52यहुदी लोकायन त्याले म्हतलं, “आता आमाले मालूम झालं कि तुह्यात भुत आत्मा हाय: अब्राहाम मरून गेला अन् भविष्यवक्ता पण मरून गेले अन् तू म्हणत, जर कोणी माह्या वचनाच पालन करीन तर तो कधी नाई मरणार. 53आमचा बाप अब्राहाम तर मरून गेला, काय तू त्याच्याऊन मोठा हाय? अन् भविष्यवक्ता पण मरून गेले, पण तू स्वताले काय समजते?” 54येशूनं उत्तर देलं, “जर मी स्वताच गौरव करीन, तर माह्य गौरव काहीच नाई, पण माह्य गौरव करणारा माह्या बाप हाय, ज्याले तुमी देव म्हणता. 55अन् तुमी तर त्याले नाई ओयखलं पण मी त्याले ओयखतो; अन् जर म्हणीन कि मी त्याले नाई ओयखत, तर मी तुमच्या सारखा खोटा ठरीन: पण मी त्याले ओयखतो अन् त्याची आज्ञा मानतो. 56तुमचा पूर्वज अब्राहाम मले पाह्याच्या आशेत लय मग्न होता; अन् त्यानं पायलं, अन् आनंद केला.” 57यहुदी लोकायन त्याले म्हतलं, “आतापरेंत तू पन्नास वर्षाचा नाई, तरी पण तू म्हणत कि तू अब्राहामले पायलं हाय?” 58येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी हाय.” 59तवा त्यायनं त्याले मारून टाक्याले गोटे उचलले, पण येशू लपून देवळातून निघून गेला.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.