योहान 21:15-17

योहान 21:15-17 MACLBSI

त्यांनी न्याहरी केल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानच्या मुला शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.”

Пов'язані відео