मत्तय 12
12
आरामाचा प्रभू
(मार्क 2:23-28; लूका 6:1-5)
1त्यावाक्ती येशू यहुदी आरामाच्या दिवशी वावरातून चालला होता, अन् त्याच्या शिष्यायले भूक लागली, तवा ते कणसं तोडून खाऊन रायले होते. 2हे पावून परुशी लोकायन येशूले म्हतलं, “पाय, आरामाच्या दिवशी जे काम तुह्या शिष्यायनं करायले पायजे नाई ते काम करू रायले हाय हे आमच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध हाय.” 3तवा येशूनं त्यायले म्हतलं कि, “तुमी वाचलं नाई काय, कि दाविद राजानं जवा तो अन् त्याच्या सोबत्यायले भूक लागली होती, तवा त्यानं काय केलं?
4तो कसा देवाच्या मंडपात गेला, अन् ज्या समर्पित भाकरी याजक शिवाय कोणीचं खाऊ नाई शकत त्या दाविदान खाल्ल्या अन् त्याच्या संगच्या सोबत्यायले पण देल्या, मोशेच्या नियमानुसार फक्त देवाच्या मंडपातल्या याजकालेच ती भाकर खाण्याची परवानगी हाय? 5तुमी मोशेच्या नियमशास्त्रात वाचलं नाई काय? कि याजकान आरामाच्या दिवशी देवळातली विधी तोडली तरी तो निर्दोष ठरतो.
6पण मी तुमाले सांगतो कि अती एक जन हाय जो ह्या देवळाहून महान हाय. 7जर तुमाले याच्या अर्थ मालूम असता, कि पवित्रशास्त्रात त्या शब्दाचा काय अर्थ हाय, कि माह्यासाठी बलिदान चढवल्या पेक्षा मले असं वाटते कि तुमी दुसऱ्याच्या विषयी दयावान बना, तवा तुमी माह्या निर्दोष शिष्याची निंदा नाई केली असती. 8माणसाचा पोरगा तर आरामाच्या दिवसावर पण अधिकार ठेवतो.”
लुल्या हाताचा माणूस
(मार्क 3:1-6; लूका 6:6-11)
9ततून निघून येशू त्यायच्या धार्मिक सभास्थानात आला. 10तती एक माणूस होता, जो लुल्या हाताचा होता. त्यायनं येशूले फसव्यासाठी विचारलं, “काय आरामाच्या दिवशी चांगलं करने बरोबर हाय?” 11येशूनं त्यायले म्हतलं, “तुमच्यातून असा कोण हाय, ज्याच्या जवळ एक मेंढरू हाय, अन् ते आरामाच्या दिवशी गड्यात पडलं, तर तो त्या मेंढराले बायर काढणार नाई काय?
12एका चांगल्या माणसाची किंमत त्या मेंढरा पेक्षा किती मोठी हाय! म्हणून आरामाच्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्रानुसार लोकायले चांगलं करन बरं हाय.” 13तवा येशूनं त्या माणसाले म्हतलं तुह्या हात पुढे कर तवा त्यानं पुढे केला, अन् तवाचं त्याचा हात बरा झाला. 14तवा परुशी लोकं बायर जाऊन त्याच्यावाल्या विरोधात सल्ला करू लागले, की येशूले कसं मारावं.
देवानं निवडलेला सेवक
15हे मालूम झाल्यावर येशू त्या जाग्यावून दूर चालला गेला, अन् लय लोकं हे आयकून की तो कसे चमत्काराचे काम करते, ते पाऊन त्याच्या जवळ आले, येशूनं त्या सगळ्या लोकायले चांगलं केलं. 16अन् त्या लोकायले दटावून सांगतल कोणाले ही सांगू नका की मी कोण हाय. 17त्यानं असं याच्यासाठी केलं, कावून कि जे देवानं यशया भविष्यवक्त्याच्या माध्यमातून म्हतलं होतं ते पूर्ण व्हावं.
18“पाहा, हा माह्यावाला सेवक हाय, ज्याले मी निवडलं, माह्या प्रिय, ज्याच्यावर माह्याले मन खुश हाय, मी माह्याला आत्मा त्याले देवून देईन, अन् तो अन्यजातीच्या लोकायले न्यायाची सुवार्था सांगीन. 19तो भांडण करणार नाई अन् ओरडणार पण नाई, अन् चौकात पण त्याच्या शब्द लय मोठ्यानं कोणाले आयकू येणार नाई. 20अन् तो कमजोर लोकायले दुख नाई देईन, जोपरेंत न्यायाचा विजय होणार नाई, तोपरेंत धुपट देणाऱ्या दिव्याले तो विजवीन नाई, पण शेवटी हे पक्कं हाय कि तो न्याय करीन, अन् विजय देईन. 21अन् अन्यजाती त्याच्या नावावर आशा ठेवीन.”
येशू अन् भुत आत्म्याच्या सरदार
(मार्क 3:20-30; लूका 11:14-23; 12:10)
22तवा लोकं एका फुटक्या-मुक्याले ज्याच्यात भुत आत्मा होता, येशू पासी आणले, अन् त्यानं त्याले चांगलं केलं, अन् तो मुका बोलू अन् पाहू लागला. 23यावर सगळे लोकं हापचक हून म्हणू लागले, “हा दाविद राजाचा पोरगा हाय कि काय?” 24पण परुशी लोकायन हे आयकून म्हतलं, “हा तर भुत आत्म्यायचा सरदार हाय जो सैतानाच्या ताकतीने भुतायले काळतो.” 25येशूनं त्यायच्या मनातली गोष्ट ओयखून त्यायले म्हतलं, “ज्या कोण्या राज्यात फुट पडते ते वसान होते, तसचं जर एकाच घरातले लोकं, एकामेकाच्या विरोधात असले तर त्या घरातले लोकं एकत्र राऊ शकत नाई.
26अन् जर सैतान आपल्याचं विरोधात होईन अन् सैतानाले काढलं, तर तो स्वताचा विरोधी होते, मंग त्याचं राज्य कसं टिकून राईन? 27अन् मी जर सैतानाच्या साह्याने भुत आत्म्यायले काढतो, तर तुमचे लोकं कोणाच्या साह्याने भुत आत्म्यायले काढते, म्हणून तेच तुमचे न्याय करतीन. 28पण जर मी देवाच्या आत्म्याच्या साह्याने भुत आत्म्यायले काढतो, तर देवाचं राज्य तुमच्यापासी आलं हाय.
29कोणी माणूस कसा कोण्या एका ताकतवान माणसाच्या घरी घुसून त्याच्या पैसा लुटू शकते, जर त्याचं घर लुट्याच अशीन तर त्याले पयले बांधा लागीन, तवाचं तो त्याच्या घरात जाऊ शकते, अन् त्याचं सगळं घर लुटू शकते. 30जो माह्याल्या संग नाई, तो माह्याल्या विरोधात हाय, अन् जो माह्याल्या संग गोळा करत नाई तो पसरवतो.”
31“मी तुमाले खरं सांगतो कि माणसाचे सगळे अपराध अन् निंदा जो तो करते क्षमा केले जाईन. जर कोणी देवाच्या आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कधीच क्षमा करणार नाई, 32जो कोणी माणसाच्या पोराच्या विरोधात काई म्हणीन, त्याचे हे पाप क्षमा केले जाईन. पण जो कोणी माणूस पवित्र आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कधीच क्षमा करणार नाई, या लोकात पण नाई, अन् भविष्यातही क्षमा केल्या जाणार नाई.”
एक झाड त्याच्या फळावरून ओयखू येते
(लूका 6:43-45)
33“जर एक झाड चांगलं अशीन तर त्याचे फळ पण चांगलं राईन, अन् जर एक झाड खराब अशीन तर त्याचे फळ पण खराब राईन, कावून कि झाड आपल्या फळावरून ओयखू येते. 34हे सर्पाच्या पिल्या सारख्या लोकोहो, तुमी बेकार असून कश्या चांगल्या गोष्टी करू शकता? कावून कि जे मनात भरून हाय तेच तोंडावर येते.
35एक चांगला माणूस आपल्या चांगल्या मनाच्या खज्याण्यातून चांगल्या गोष्टी काढतो, अन् बेकार माणूस आपल्या बेकार मनाच्या खज्याण्यातून बेकार गोष्टी काढते. 36अन् मी तुमाले सांगतो, कि जे-जे बेकार गोष्टी माणसं करतीन, न्यायाच्या दिवशी हरएक गोष्टीचा देवा समोर लेखा देतीन.
येशू पासून चिन्ह
(मार्क 8:11-12; लूका 11:29-32)
37कावून कि देव न्याय करीन अन् एका माणसाले त्याच्या व्दारे म्हतलेल्या शब्दाच्या कारणाने त्याले निर्दोष किंवा दोषी घोषित करणार.” 38यावर कईक मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनं अन् परुशी लोकायन त्याले म्हतलं, “हे गुरु, आमाले तुह्या पासून एक चिन्ह चमत्कार पाह्याची इच्छा हाय.”
39येशूनं त्यायले उत्तर देलं, “ह्या पिढ्यातले बेकार लोकं चमत्कार पहाची इच्छा ठेवते, पण मी तुमाले खरं सांगतो कि त्यायले योना भविष्यवक्ताच्या चमत्कारा शिवाय कोणताच चमत्कार देला जाणार नाई. 40अन् जसा योना भविष्यवक्ता तीन दिवस तीन रात्र, मोठ्या मासोईच्या पोटात होता, तसाच मी, माणसाचा पोरगा तीन दिवस व तीन रात्र जमिनीच्या कबरेत राईन.
41नीनवे शहरातले रायणारे लोकं न्यायाच्या दिवशी या काळातल्या लोकाय संग उठून त्यायले दोषी ठरवतीन, कावून कि त्यायनं योनाचा प्रचार आयकून, मन फिरवलं, अन् पाहा, जो अती हाय तो योना भविष्यवक्त्याहून पण मोठा हाय, पण तरी तुमी पश्चाताप कऱ्याले नाकारता. 42दक्षिण दिशेची राणी न्यायाच्या दिवशी या युगाच्या लोकाय संग उठून त्यायले दोषी ठरविन, कावून कि ती सुलैमानचं ज्ञान आयक्यासाठी लय दुरून आली, अन् पाहा, अती जो हाय तो सुलैमान पेक्षा हि मोठा हाय, पण तरी तुमी पश्चाताप कऱ्याले नाकारता.”
भुत आत्माले एका घराचा शोध
(लूका 11:24-26)
43“जवा भुत आत्मा माणसातून निघून जाते, तवा ते सुख्या जागेत आराम पायाले फिरते पण भेटत नाई, 44तवा ते स्वताले म्हणते कि मी ज्या माणसातून बायर आली हाय त्याचं माणसात वापस जाईन, अन् ते त्या माणसाच्या जीवनाले त्या घरा सारखं पायते जे साप सुफ केलं हाय.
45तवा ते भुत आत्मा जाऊन आपल्या संग अजून सात भुत आत्म्यायले घेऊन येते, अन् त्या माणसात बसून ततीच रायते, तवा त्या माणसाची दशा मांगच्या दशेपेक्षा हि बेकार होते, या काळाच्या बेकार लोकायची दशा पण अशीच होईन.”
येशूच खरं कुटुंब
(मार्क 3:31-35; लूका 8:19-21)
46जवा येशू लोकायच्या संग गोष्टी करूनच रायला होता, तवा येशूची माय अन् त्याचा भाऊ तती आले, अन् बायरून निरोप पाठून त्यायन येशूले बलावलं. कावून कि ते त्याच्या संग गोष्टी कऱ्याले पावून रायले होते. 47येशूच्या आजूबाजून लय लोकं बसले होते, काई लोकायन येऊन त्याले म्हतलं, “कि तुमची माय व लायना भाऊ बायर तुमचा शोध करून रायले हाय.”
48हे आयकून येशूनं, म्हणाऱ्यायले उत्तर देलं, “माह्यी माय अन् माह्या भाऊ कोण हाय?” 49अन् येशूनं आपल्या शिष्याच्या इकडे हात पुढे करून म्हतलं, पाहा, “माह्याली माय अन् माह्याला भाऊ हे हायत. 50कावून कि जो कोणी देवाचा इच्छेप्रमाणे वागते व चलते, तोच माह्याला भाऊ अन् बहिण अन् माय हाय.”
Айни замон обунашуда:
मत्तय 12: VAHNT
Лаҳзаҳои махсус
Паҳн кунед
Нусха
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.