1
मत्तय 7:7
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
Comparar
Explorar मत्तय 7:7
2
मत्तय 7:8
जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते.
Explorar मत्तय 7:8
3
मत्तय 7:24
म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे
Explorar मत्तय 7:24
4
मत्तय 7:12
लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात.
Explorar मत्तय 7:12
5
मत्तय 7:14
परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.
Explorar मत्तय 7:14
6
मत्तय 7:13
अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
Explorar मत्तय 7:13
7
मत्तय 7:11
मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल!
Explorar मत्तय 7:11
8
मत्तय 7:1-2
तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल.
Explorar मत्तय 7:1-2
9
मत्तय 7:26
उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो.
Explorar मत्तय 7:26
10
मत्तय 7:3-4
तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.
Explorar मत्तय 7:3-4
11
मत्तय 7:15-16
खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय?
Explorar मत्तय 7:15-16
12
मत्तय 7:17
त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.
Explorar मत्तय 7:17
13
मत्तय 7:18
चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही.
Explorar मत्तय 7:18
14
मत्तय 7:19
चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.
Explorar मत्तय 7:19
Início
Bíblia
Planos
Vídeos