मत्तय 8

8
कुष्ठरोग्याले बरं करनं
(मार्क 1:40-45; लूका 5:12-16)
1जवा येशू पहाडावरून उतरला, तवा एक मोठी लोकायची गर्दी त्याच्यावाल्या मांग येऊ लागली. 2अन् पाहा, एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला, अन् त्याच्या पुढे येऊन टोंगे टेकून त्यानं त्याले विनंती केली, “हे प्रभू जर तुह्यी इच्छा अशीन तर तू मले बरं#8:2 बरं मोशेच्या नियमशास्त्राच्या अनुस्वार कुष्ठरोग लोकायले अशुद्ध मानल्या जात होतं, लैव्यव्यवस्था 13:46 करू शकते.”
3तवा येशूने आपले हात पुढे करून त्याले स्पर्श केला, अन् म्हतलं, “माह्यावाली इच्छा हाय, कि तू बरा हून जाय. अन् तो लगेचं त्याच्या कुष्ठरोगाने बरा झाला.” 4तवा येशूने त्याले म्हतलं, “पाह्य, कोणाले ही सांगू नको, पण तू जाऊन याजकाले#8:4 याजकाले यहुदी लोकायच्या देवळात सेवा करणाऱ्याले दाखवं, अन् तू चांगल्या झाल्यावर जे काई मोशेनं आपल्या नियमशास्त्रात कऱ्याले लावलं त्याच्याच अनुसार देवाले अर्पण कर, की लोकायले माईत व्हावं की तू बरा झाला हाय.”
सुभेदाराचा विश्वास
(लूका 7:1-10; योहान 4:43-54)
5अन् जवा येशू कफरनहूम शहरामध्ये आला, तवा एका शंभर शिपायायचा अधिकाऱ्यान त्याच्यापासी येऊन त्याले विनंती केली अन् म्हतलं. 6“हे प्रभू, माह्याला सेवक लकव्याच्या रोगानं घरी लय बिमार हाय, अन् तो जाग्यावून हालू पण नाई शकत.” 7तवा येशूनं त्याले म्हतलं, “मी येऊन त्याले बरं करणार.”
8शंभर शिपायायचा अधिकाऱ्यान उत्तर देलं, कावून कि तो अन्यजातीचा होता, म्हणून त्यानं म्हतलं, “हे प्रभू, मी या योग्य नाई, कि तू माह्याल्या घरात यावं, पण तू येथून जरी बोलला तरी माह्याला सेवक बरा होऊन जाईन. 9मी हे समजतो, कावून कि मी पण एका अधिकारी माणसाच्या आधीन हाय, अन् सेवक लोकं माह्याल्या आधीन हायत, जवा मी एकाला म्हणतो कि जाय तवा तो जाते, अन् दुसऱ्याले म्हणतो ये तवा तो येते, अन् जवा म्हणतो आपल्या दासाला हे कर तवा तो करते.”
10हे आयकून येशू हापचक झाला, अन् जे लोकं त्याच्या मांग येऊ रायले होते त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, कि मी इस्राएल देशामध्ये एक हि असा व्यक्ती नाई पायला, जो या अन्यजाती माणसा सारखा माह्यावर भरोसा करते. 11अन् मी तुमाले सांगतो, कि पूर्व अन् पश्चिम दिशेतून लय सारे अन्यजातीचे लोकं येवून अब्राहाम अन् इसहाक अन् याकोबच्या संग स्वर्गाच्या राज्यात बसतीन व जेवण करतीन.
12पण यहुदी लोकं जे देवाच्या राज्यात असाले पायजे, बायर अंधकारात टाकले जातीन, ततीसा रडणं अन् दात खानं होईन, अन् त्यायले लय तरास होईन.” 13तवा येशूनं सुभेदाराले म्हतलं, “जसा विश्वास तुह्याला हाय, तसचं तुह्याल्या साठी हो” त्याच्यावाला सेवक त्याचं वाक्ती बरा झाला.
पतरसच्या घरी लय रोग्यायले बरं करनं
(मार्क 1:29-34; लूका 4:38-41)
14येशू अन् त्याचे शिष्य जवा पतरसच्या घरी आले, तवा त्यानं पतरसच्या सासूले तापाने लय बिमार पडलेली पलंगावर पायलं. 15तवा येशूनं तिच्या हाताले स्पर्श केला, अन् तिचा ताप तवाच उतरला, तवा ती उठली अन् तिनं त्यायले जेवण देऊन त्यायची सेवा केली.
16त्याचदिवशी संध्याकाळच्या वाक्ती म्हणजे सुर्य डूबल्यावर जवा आरामाचा दिवस संपला, तवा बऱ्याचं बिमार लोकायले, अन् भुत आत्मा लागलेल्या लोकायले, येशू पासी आणले व त्यानं त्या भुत आत्मा लागलेल्या लोकायतून भुतायले आपल्या अधिकाराच्या द्वारे काढून टाकलं, अन् सगळ्या बिमार लोकायले चांगलं केलं. 17ह्या साठी कि जे वचन यशया भविष्यवक्त्याच्या इकडून म्हणल्या गेलं होतं ते पुरं व्हावं, “त्यानं स्वताच आमच्या कमजोरीले घेऊन घेतलं, अन् आमच्या बिमारीले बरं केलं.”
येशूचे शिष्य बन्याची किंमत
(लूका 9:57-62)
18जवा येशूने आपल्या चवभवंताल लोकायची मोठ्या गर्दीले पायलं, तवा त्यानं शिष्यायले समुद्राच्या तिकळच्या बाजूनं जायाची आज्ञा देली, 19तवा एका मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकानं येशू पासी येऊन म्हतलं, “हे गुरु जती कुठी तू जाशीन तती मी तुह्यावाला शिष्य बनून तुह्यावाल्या मांग येईन.” 20येशूनं त्याले म्हतलं, “कोल्ह्याले तर रायाले बिडे हायत अन् अभायातल्या पाखरायले रायाले खोपे हायत, पण माणसाच्या पोराले राह्यासाठी पण जागा नाई.”
21एका शिष्यानं त्याले म्हतलं, “हे प्रभू मले पयले जाऊ दे कि मी आपल्या बापाले रोऊन येतो, अन् मंग येऊन तुह्याल्या मांग येतो.” 22येशूनं त्याले म्हतलं “तू माह्य अनुकरण कर, अन् मुर्द्यायले आपले मुर्दे रोऊ दे.”
वारावायद्णाले शान्त करनं
(मार्क 4:35-41; लूका 8:22-25)
23जवा येशू डोंग्यावर चढला तवा त्याचे शिष्य पण लोकायच्या गर्दीले सोडून त्याचं डोंग्यात येशूच्या संग चालले गेले. 24अन् मंग समुद्रात लय वारावायद्न सुरु झाले, अन् लाटा डोंग्यावर येऊन रायल्या होत्या, अन् तो डोंगा डुबून रायला होता. अन् येशू डोंग्याच्या खालच्या भागात झोपला होता. 25तवा शिष्यायनं येशू पासी येऊन त्याले उठवलं, अन् म्हतलं, “हे प्रभू आमाले वाचव कावून कि आमी डुबून रायलो हावो.”
26तवा येशूनं त्यायले म्हतलं, “हे अल्पविश्वासायनो तुमी कावून भेता?” तवा येशूनं उठून त्या वारावायद्णाले दटाऊन म्हतलं, “शांत राय, थांबून जाय” तवा वारावायद् थांबले! 27अन् ते लोकं हापचक होऊन एकमेकाय संग बोलू लागले, “हा कसा माणूस हाय, की वारावायद्न अन् समुद्र पण त्याची आज्ञा मानते.”
भुत आत्म्यायले डुकरायच्या कळपात पाठवन
(मार्क 5:1-20; लूका 8:26-39)
28येशू व त्याचे शिष्य समुद्राच्या तिकडच्या बाजुले गरसेकरांच्या प्रांतात पोहचले. अन् जवा तो डोंग्यातून खाली उतरला, तवा लगेचं एक भुत लागलेला माणूस म्हसाणखाईतून निघून येशू पासी आला. तो एवढा ताकतवान होता कि त्याच्या भितीनं त्या रस्त्याऊन कोणीचं जाऊ शकत नव्हत. 29अन् त्यानं जोऱ्यानं कल्ला करून म्हतलं, “हे येशू, सर्वशक्तिमान देवाचा पोरा तू माह्या कामात अर्थळे कायले आणते, काय तू नेमलेल्या वेळेपूर्वी आमाले दुख द्याले अती आला हाय?”
30तती पहाडाच्या बाजुले डुकरायचा एक मोठा कळप चरून रायला होता, 31तवा त्या भुतायनं येशूले विनंती केली की, “जर तू आमाले बायर काढत असशीन तर आमाले त्या डुकराईत पाठवून दे, की आमी त्यायच्या अंदर राहू.” 32येशूनं त्यायले परवानगी देली तवा ते सर्वे भुत आत्मे त्याच्यातून निघून डूकराईच्या अंदर घुसले, अन् तो सुमारे दोन हजार डुकरायचा कळप होता, तो धावत पहाडीवरून कुदला अन् पाण्यात डुबून मेला.
33तवा हे पावून डुकरं चारणारे पयाले व गावात जाऊन भोभाटा करून लोकायले या घटनेच्या बाऱ्यात सर्व काई सांगितले, अन् तसचं ज्याच्यात भुत आत्मे होते, त्याच्या बद्दल सगळं काई सांगीतलं. 34त्या नगरातून लय लोकं जे झालं होतं ते पाह्याले येशू पासी भेट करायले आले. अन् तवा लोकायन येशूले विनंती केली अन् मतलं आमच्या गावातून निघून जाय.

Terpilih Sekarang Ini:

मत्तय 8: VAHNT

Highlight

Kongsi

Salin

None

Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk