मत्तय 4

4
जंगलात येशूची परीक्षा
(मार्क 1:12-१3; लूका 4:1-13)
1तवा पवित्र आत्मा येशूले सुनसान जागी घेऊन गेला, ह्या साठी कि सैतानाने त्याची परीक्षा घेतली पायजे. 2अन् तो चाळीस दिवस अन् चाळीस रात्र उपासी रायला, तवा त्याले भूक लागली. 3तवा सैतान त्याच्यापासी येऊन म्हणू लागला, “जर तू देवाचा पोरगा असशीन, तर त्या गोट्याले भाकरी बनायची आज्ञा देऊन हे पक्कं कर, कि तू त्या खाऊ शकला पायजे.”
4तवा येशूनं उत्तर देलं, “पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि माणूस फक्त भाकरीनच नाई, तर देवाच्या हरेक वचनाले मानून जिवंत राईन.” 5मंग सैतानाने येशूले पवित्र शहर यरुशलेमात नेऊन देवळाच्या काटावर उभं केलं.
6अन् त्याले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा असशीन, तर आपल्या स्वताले खाली पाडून सिद्ध कर, अन् तुले मार नाई लागीन, कावून कि पवित्रशास्त्रात असं लिवलेले हाय, कि तो आपल्या देवदूतायले आज्ञा देईन, अन् ते तुह्याले पाय गोट्यावर आपटू नये म्हणून आपल्या हातावर झेलून घेतीन.”
7तवा येशूने सैतानाले म्हतलं, “पवित्रशास्त्रात हे पण लिवलेल हाय, कि तू आपल्या प्रभू आपल्या देवाची परीक्षा करू नको.” 8मंग सैतान त्याले एका मोठ्या उंच पहाडावर घेऊन गेला, अन् सर्व्या जगाचे राज्य अन् वैभव दाखवून 9त्याले म्हतलं, “जर तू वाकून मले नमन करशीन, तर मी हे सगळे तुले देऊन देईन.” 10तवा येशूनं त्याले म्हतलं, “हे सैताना तू माह्यापासून दूर हून जा, कावून कि पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि तू आपल्या प्रभू देवालेच नमन कर, अन् फक्त त्याचीच आराधना कर.” 11तवा सैतान त्याच्यापासून चालला गेला, अन् पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.
येशूच्या उपदेशाची सुरुवात
(मार्क 1:14-15; लूका 4:14-15)
12जवा राजा हेरोदेसन हे आयकलं कि योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले जेलात टाकले, तवा तो यहुदीया प्रांताले सोडून गालील प्रांतात चालला गेला. 13अन् नासरत नगराले सोडून कफरनहूम शहरात जे गालील समुद्राच्या किनाऱ्यावर होतं जती जबलुन कुळाचे अन् नप्ताली कुळाचे लोकं रायत होते, जाऊन रावू लागला.
14ह्या साठी कि जे वचन यशया भविष्यवक्त्याच्या इकडून म्हणल्या गेलं होतं, ते पूर्ण व्हावं. 15“तुमी लोकं जे जबलुन कुळाच्या भागात रायता, अन् नप्ताली जनजातीच्या जमिनीवर जे गालील समुद्राच्यापासी हाय अन् यरदन नदीच्या पूर्व भागात हाय ते ह्या गालील प्रांतात हाय, जती अन्यजाती रायतात.
16तुमी लोकं जे अंधारात जीवन जगत हाय, जे देवाले ओयखत नाईत ते लोकं या प्रकाशमान ऊजीळाले पायतीन, अन् तो ऊजीळ तुमाले तारणाचा रस्ता दाखविन, जे लोकं देवाला नाई ओयखत ते लोकं सर्वकाळाच्या मरणाच्या रस्त्यावर हायत.” 17तवा पासून येशू उपदेश करू लागला, अन् म्हणू लागला, “आपआपल्या पापांपासून मन फिरून पश्चाताप करा, कावून कि देवाचं राज्य जवळ आलं हाय.”
पयल्या शिष्याची निवळ
(मार्क 1:16-20; लूका 5:1-11; योहान 1:35-42)
18एका दिवशी येशू गालील समुद्राच्या किनाऱ्यावरून जाऊन रायला होता, अन् त्यानं शिमोन ज्याले पतरस म्हणत जात व त्याचा भाऊ आंद्रियासले समुद्रात जाळं टाकतांना पायलं, कावून कि ते मासोया पकडणारे लोकं होते. 19मंग येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य अनुकरण करा, व माह्याले शिष्य बना, आतापरेंत तुमी मासोया पकडणारे होते, पण आज पासून मी तुमाले हे शिकवतो की लोकायले माह्या जवळ विश्वासात कसं आणावं.”
20मंग त्यायन लवकरच मासोया पकडनं थांबवलं, अन् ते त्याच्या मांग गेले. 21जवा येशू व त्याचे दोन शिष्य किनाऱ्यावरून समोर चालत गेले, त्यानं अजून दुसरे दोन भावायले पायलं जे जब्दीचे पोरं याकोब अन् योहान होते, जे त्यायचा बाप जब्दी संग एका डोंग्यात बसून आपले जाळे तयार करत होते, तवा त्यानं त्यायले पण बलावलं. 22तवा ते लगेचं डोंग्याले अन् आपला बाप जब्दीले सोडून त्याच्यावाल्या मांग निघाले.
गालील मध्ये रोगीले बरं करणे
(लूका 6:17-19)
23तवा येशू गालील प्रांतातील बऱ्याचं जागी फिरत होता, अन् त्यायच्या धार्मिक सभास्थानात जाऊन सुवार्था प्रचार करत होता, अन् देवाच्या राज्याचे तारणाचा संदेश देत होता, व लोकायच्या सर्व प्रकारच्या बिमाऱ्या अन् कमजोऱ्यायले बरे करत होता.
24अन् सगळ्या सिरिया प्रांतात येशूच्या नावाची कीर्ती लय पसरली, तवा लोकं लय साऱ्या बिमार लोकायले, जे लय प्रकारच्या बिमारीनं अन् दुखानं पडलेले होते, अन् ज्यायच्यात भुत आत्मा होती व मिर्गीवाले अन् लकव्याचे रोगी होते त्या सर्वांले येशू पासी आणलं अन् त्यानं त्यायले बरं केलं. 25अन् गालील प्रांतात व दिकापुलिस प्रांतात अन् यरुशलेम शहरात अन् यहुदीया प्रांतातून अन् यरदन नदीच्या पलीकडून लोकायची मोठी गर्दी येशूच्या मांग आली.

Terpilih Sekarang Ini:

मत्तय 4: VAHNT

Highlight

Kongsi

Salin

None

Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk

Video untuk मत्तय 4