लुका 22

22
येशूची हत्याचा षड्‍यंत्र
(मत्तय 26:1-5,14-16; मार्क 14:1-2,10-11; योहान 11:45-53)
1-2बेखमीर भाकरीचा फसह सण, जो यहुदी लोकायचा सण म्हणतात, तो जवळ आला होता. अन् मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ह्या विषयी विचार करत होते, कि त्याले कसं पकडून मारून टाकू, पण ते लोकांना भेत होते.
यहुदा इस्कोरोतीचा विश्वासघात
3तवा सैतान यहुदाच्या अंदर घुसला, ज्याले यहुदा इस्कोरोती म्हणतात, जो बारा शिष्याइतून एक होता. 4तवा त्यानं जाऊन मुख्ययाजकाच्या अन् पहारेकरिच्या सरदारायच्या संग गोष्टी केल्या, कि येशूला त्यायच्या हाती कसे धरून द्यावं. 5तवा त्यायले आनंद झाला, अन् तवा त्यायनं त्याले पैसे देण्याचे वचन देले. 6त्यानं ते मान्य केलं, अन् मौका पाऊ लागला, कि बिना उपद्रव करून त्याले कसं त्यायच्या हातात पकडून देऊ.
फसहची तयारी
(मत्तय 26:17-25; मार्क 14:12-21; योहान 13:21-30)
7-8बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, ज्याच्यात फसहचा कोकरू बलिदान करणे आवश्यक होतं. तवा येशूनं पतरस अन् योहानाले हे सांगून पाठवलं, कि “जाऊन आमच्यासाठी खायाले फसह सणाच जेवण तयार करा.” 9त्यायनं त्याले विचारलं, “तुह्य म्हणनं काय हाय, कि आमी कुठं जाऊन तुह्यासाठी फसह सणाचे जेवण तयार करू?” 10त्यानं त्यायले सांगतल, पाहा, नगरात जातांना तुमाले एक माणूस पाण्याचा माठ घेऊन जातांना दिसीन, ज्या घरी तो जाईन, त्याच्या मांग-मांग तुमी चालले जाजा. 11अन् त्या घरच्या मालकाले सांगा, कि तुले गुरुजी म्हणतात कि माह्यी बैटक खोली कुठं हाय ज्याच्यात मी माह्या शिष्याई संग बेखमीर फसह सणाच जेवण खाऊ? 12अन् तो तुमाले स्वता सजवलेली अन् तयार केलेली एक मोठी माळी दाखविन, तती ते तयार करजा. 13त्यायनं जाऊन, जसं त्यानं त्यायले सांगतल होतं, अन् जसं येशूनं त्यायले सांगतल होतं, तसचं पायलं, अन् बेखमीर फसह सणाच जेवण तयार केलं.
प्रभूचा शेवटचा जेवण भोज
(मत्तय 26:16-30; मार्क 14:22-26; 1 करिं 11:23,25)
14मंग जवा ते वेळ आली, तवा येशू आपल्या निवडलेल्या बारा प्रेषिताय सोबत जेव्याले बसला. 15अन् त्यानं त्यायले म्हतलं, “माह्याली फार इच्छा होती, कि दुख भोग्याच्या अन् मरणाच्या पयले हे फसह सणाच जेवण तुमच्या संग खाव. 16कावून कि मी तुमाले सांगतो की, देवाच्या राज्यात याचा अर्थपूर्ण पणे नाई देल्या जात तोपरेंत हे जेवण जेवणार नाई.” 17तवा त्यानं प्याला घेतला अन् धन्यवाद देऊन म्हतलं, “हे घ्या अन् आपसात वाटून टाका. 18कावून कि, मी तुमाले सांगतो, कि जतलग देवाचं राज्य नाई येईन, तोपर्यंत अंगुराचा रस कधीच पिणार नाई.” 19मंग त्यानं भाकर घेतली, अन् धन्यवाद देऊन तोडली, अन् त्यायले हे म्हणून देली, कि “हे माह्यावालं शरीर हाय, जे तुमच्यासाठी देलं हाय, माह्या आठवणीत हेच करत जा.” 20मंग त्याप्रमाणे जेवल्यावर त्यानं प्यालाहि हे म्हणून देला, कि “हा प्याला म्हणजे माह्याल्या रक्तात जे तुमच्यासाठी ओतले जात हाय, नवीन करार हाय. 21पण पाहा, मले धरून देणाऱ्याचा हात माह्या बरोबर जेवणाच्या टेबलावर हाय. 22पण मी, माणसाचा पोरगा जसं त्याच्या बाऱ्यात ठरवलेलं हाय कि तो मरणारच, पण त्या माणसासाठी दुख हाय, कि त्याच्यापासून माणसाचा पोरगा पकडल्या जाते.” 23तवा ते आपसात विचारपूस करू लागले, कि “आपल्यात कोण हाय जो असं काम करीन?”
कोण मोठा समजला जाईन?
24त्यायच्याईत हा झगडा पण झाला, कि आपल्या मधी मोठा कोण समजला जातो? 25तवा येशूनं त्यायले म्हतलं, “अन्यजातीचे राजे त्यायच्यावर शासन करतात, अन् जे त्यायच्यावर अधिकार ठेवतात, ते परोपकारी म्हणलं जातात. 26पण तुमी असे नको बना, पण जो कोणी तुमच्यात मोठा हाय, तो लायण्या सारखा अन् जो प्रधान हाय, त्यानं सेवका सारखं बनले पायजे. 27कावून कि मोठा कोण हाय, तो जो जेव्याले बसलेला हाय या तो जो सेवा करत हाय? काय तो नाई जो जेव्याले बसलेला हाय? पण मी तर तुमच्या मध्ये सेवका सारखा हाय.”
28“पण तुमी ते आहा, जे माह्याल्या परीक्षेत लगातार माह्याल्या संग रायले; 29अन् जसं माह्याल्या बापानं माह्याल्यासाठी एक राज्य नेमून देले हाय, तसेच मी हि तुमच्यासाठी नेमून ठेवला हाय. 30यासाठी कि तुमी माह्याल्या राज्यात माह्याल्या जेवणाच्या टेबलावर खावे प्यावे; अन् सिहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.”
पतरसच्या नाकारण्याची भविष्यवाणी
(मत्तय 26:31-35; मार्क 14:27-31; योहान 13:36-38)
31अन् प्रभून त्याले म्हतलं, “शिमोना, हे शिमोना, सैतानान तुमी लोकायले मांगतलं हाय, कि गव्हासारखे चाळावे. 32पण मी तुह्यासाठी प्रार्थना केली हाय कि तुह्या विश्वास खचु नये, अन् जवा तू फिरलास तवा तू आपल्या भावायले स्थिर करजो.” 33तवा त्यानं येशूले म्हतलं, “हे प्रभू, मी तुह्या संग जेलात जायले अन् मराले पण तयार हाय.” 34येशूनं म्हतलं, “हे पतरस मी तुले सांगतो, आज कोंबडा बाग देयाच्या पयले, तू तीन वेळा मले नकारसीन, कि मी याले ओयखत नाई.”
दुख सोसायले तयार राहा
35अन् येशूनं त्यायले म्हतलं, “जवा मी तुमाले पिशवी अन् झोई व चप्पल शिवाय पाठवलं, तवा काय तुमाले कोण्या वस्तुची घटी झाली” त्यायनं म्हतलं, “कोण्याचं वस्तुची नाई.” 36तवा येशूनं त्यायले म्हतलं, “पण आता ज्याच्यापासी पिशवी हाय त्यानं ते घ्यावी अन् तसचं झोई पण घ्यावी, अन् ज्याच्यापासी तलवार नाई हाय त्यानं आपले कपडे इकून एक विकत घ्यावी. 37कावून कि मी तुमाले म्हणतो, हे जे पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि तो अपराध्या मध्ये मोजला जाईन, ते माह्यात पूर्ण होणं अवश्य हाय, कावून कि माह्या विषयाच्या गोष्टी पूर्ण होणार हाय.”
38तवा त्यायनं म्हतलं, “हे प्रभू येशू, पाहा अती दोन तलवारा हायत,” त्यानं त्यायले म्हतलं “लय हाय.”
जैतूनच्या पहाडावर येशूची प्रार्थना
(मत्तय 26:36-46; मार्क 14:32-42)
39तवा तो बायर निघून आपल्या रीतीच्या प्रमाणे जैतून पहाडावर गेला, अन् त्याचे शिष्य त्याच्या मांग-मांग गेले. 40त्या जागी पोहचल्यावर त्यानं त्यायले म्हतलं, “प्रार्थना करा, कि तुमी परीक्षेत नाई पडावं.” 41अन् तो स्व:ता त्यायच्यातून अलग एक गोटा जेवड्या दूर फेकू शकतो तेवढ्या अंतरावर तो गेला, अन् टोंगे टेकून प्रार्थना करू लागला. 42त्यानं म्हतलं, “हे देवबापा, जर तुह्याली इच्छा अशीन तर हा दुखाचा प्याला माह्याल्या पासून दूर कर, तरी पण माह्याली इच्छा नाई पण तुह्याली इच्छा पूर्ण होवो.” 43तवा स्वर्गातून एक देवदूत त्याले दिसला जो त्याले सामर्थ्य देत होता. 44मंग तो अत्यंत व्याकूळ होऊन अधिकच दुखात प्रार्थना करू लागला; तवा त्याचा घाम रक्ताच्या मोठं-मोठ्या थेंबा सारखा जमिनीवर पडत होता. 45तवा तो प्रार्थना झाल्यावर उठला, अन् आपल्या शिष्याच्या पासी आल्यावर त्यायले उदाशीच्या माऱ्यान झोपलेलं पायलं. 46अन् त्यायले म्हतलं, “कावून झोपता? उठा, प्रार्थना करा, कि तुमी परीक्षेत नाई पडावं.”
येशूले बन्दी बनवण
(मत्तय 26:47-56; मार्क 14:43-50; योहान 18:3-11)
47जवा तो बोलतच होता, कि पाहा, लोकायची एक मोठी गर्दी आली, अन् त्या बारा शिष्याय पैकी एक ज्याचं नाव यहुदा इस्कोरोती होते त्यायच्या समोर-समोर येऊन रायला होता, तवा तो मुका घीयाले येशू पासी आला. 48अन् येशूनं त्याले म्हतलं, “हे यहुदा इस्कोरोती, काय तू मुका घेऊन माणसाच्या पोराला पकडून देतोस.” 49जवा येशूच्या सोबत्यायनं हे पायलं, कि काय होणार हाय, तर म्हतलं, “हे प्रभू, काय आमी तलवार चालवावी?” 50तवा येशूच्या सोबत्यायपैकी कोण्या एकानं महायाजकाच्या दासावर तलवार चालवली अन् त्याच्या उजवा कान कापून टाकला. 51ह्यावर येशूनं म्हतलं, “आता थांबून जा,” अन् त्याच्या कानाले स्पर्श करून त्याले चांगलं केलं. 52तवा येशूनं मुख्ययाजकायले अन् देवळाच्या पहारेकरायच्या सरदारायले अन् यहुदी पुढाऱ्यायले जे त्याच्यावर चढून आले होते, म्हतलं, “काय तुमी डाकू समजून तलवार अन् काळ्या घेऊन मले पकड्याले आले हा? 53जवा मी दररोज देवळात तुमच्या संग होतो, तवा तुमी मले नाई पकडलं, पण हे तुमची वेळ हाय, अन् अंधाराचा अधिकार हाय.”
पतरसचा नाकार
(मत्तय 26:57-58,69-75; मार्क 14:53-54,66-72; योहान 18:12-18,25-27)
54मंग ते त्याले पकडून घेऊन गेले, अन् महायाजकाच्या घरी आणले, अन् पतरस दुरून-दुरून त्यांच्या मांग-मांग चालत होता. 55अन् जवा ते आंगणात शेकोटी जाळून एकत्र बसले होते, तवा पतरस पण त्यायच्यात बसला. 56अन् एका दासीने त्याले शेकोटीच्या ऊजीळात बसलेलं पायलं, अन् त्याच्याइकडे पाऊन म्हणू लागली, “हा पण त्याच्यावाल्या संग होता.” 57पण पतरसन नकारून म्हतलं, “हे बाई, मी त्याले ओयखत नाई.” 58थोड्याच वेळा नंतर, कोण्या एकाने त्याले पाऊन म्हतलं, “तू पण त्यायच्यातला हायस,” तवा पतरसन म्हतलं, “हे माणसा मी त्यायच्यातला नाई हाय.” 59मंग एका तासा नंतर, एक आणखी माणूस खात्रीने म्हणू लागला, “खरोखर हा पण त्याच्यावाल्या संग होता, कावून कि हा गालील प्रांताचा माणूस हाय.” 60पण पतरसने म्हतलं, “हे माणसा मले नाई माईत तू काय बोलतोस?” तो बोलतचं होता कि लगेचं कोंबड्याने बाग देला. 61तवा प्रभूने वळून पतरसच्या इकडे पायलं, अन् पतरसले प्रभूची म्हतलेली गोष्ट आठवली जे त्यानं सांगतली होती, कि “कोंबडा बाग देयाच्या पयले, तू तीन वेळा माह्या नकार करशीन.” 62अन् तो बायर निघून, फार दु:खी होऊन खूप रडू लागला.
येशूची थट्टा
(मत्तय 26:67-68; मार्क 14:65)
63अन् ज्या लोकांनी येशूले पकडले होते, ते त्याची थट्टा करत, अन् मारत होते. 64अन् त्याच्या डोयावर पट्टी बांधून अन् मारून त्याले विचारलं, कि “भविष्यवाणी करून सांग कि तुले कोण मारलं.” 65अन् त्यायनं बऱ्याचं निरनिराळ्या गोष्टी करून त्याच्यावाली निंदा केली.
पुरनिए अन् न्यायसभेच्या सामोर येशू
(मत्तय 26:59-66; मार्क 14:55-64; योहान 18:19-24)
66जवा दिवस उगवला तवा यहुदी पुढारी अन् मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक एकत्र झाले, अन् येशूले आपल्या न्यायसभेचे आणून विचारू लागले, 67“जर तू ख्रिस्त असशीन, तर आमाले सांग!” तवा येशूनं त्यायले म्हतलं, “जर मी तुमाले सांगतले तर तुमी विश्वास करणार नाई. 68अन् जर मी विचारले तर तुमी मले कधीच उत्तर देणार नाई. 69पण यापुढे माणसाचा पोरगा सामर्थशाली देवाच्या उजव्या बाजूने बसलेला राईन.” 70ह्यावर ते सर्व जन म्हणाले, “तू काय देवाचा पोरगा हायस?” त्यानं त्यायले म्हतलं, “तुमी स्वताच म्हणता, कावून कि मी हाय.” 71तवा त्यायनं म्हतलं, “आता आमाले साक्षीदारायची काई गरज नाई, कावून कि आमी स्वताच त्याच्या तोंडातून आयकलं हाय.”

Terpilih Sekarang Ini:

लुका 22: VAHNT

Highlight

Kongsi

Salin

None

Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk