YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 1:17-21

जखर्‍या 1:17-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’ मी आपले डोळे वर करून पाहिले आणि पाहा, चार शृंगे दृष्टीस पडली. माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “ही काय आहेत?” त्याने मला म्हटले, “ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे.” आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखवले. मी विचारले, “ह्यांचे येथे काय काम?” तो मला म्हणाला, “ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.”

सामायिक करा
जखर्‍या 1 वाचा

जखर्‍या 1:17-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरूशलेमची निवड करील.” मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली! माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.” मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले. मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”

सामायिक करा
जखर्‍या 1 वाचा