रूथ 1:1-18
रूथ 1:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसांत बेथलेहेम-यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेख व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्यांच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती; हे एफ्राथी म्हणजे बेथलेहेम-यहूदा येथील रहिवासी होते; ते मवाब देशात जाऊन राहिले. पुढे नामीचा पती अलीमलेख हा वारला आणि नामी व तिचे दोन पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या; एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे दहा वर्षे राहिले. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले; ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती तेथून निघून यहूदा देशास जायला मार्गस्थ झाली. नामी आपल्या सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा; तुम्ही जशी माझ्या मृतांवर व माझ्यावर माया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हांला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या गळा काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, “नाही, नाही; आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.” नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? माझ्या मुलींनो, माघारी जा; मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही; मी म्हटले की मला पती मिळायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.” मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले.
रूथ 1:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला. त्या मनुष्याचे नाव अलीमलेख व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते, आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन होते. ते एफ्राथी म्हणजे यहूदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते. ते मवाब देशी राहायला गेले. नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली. त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले. मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली. परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जायला निघाली. ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जायला निघाली. नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या. त्या तिला म्हणाल्या, “नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.” नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले, तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.” मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली. ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.” रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.
रूथ 1:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला. त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब या देशात गेले आणि तिथे राहिले. आता नाओमीचा पती एलीमेलेख मरण पावला आणि ती तिच्या दोन पुत्रांसह एकटी राहिली. त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर, महलोन आणि किलिओन हे दोघेही मरण पावले आणि आता नाओमी तिचे दोन पुत्र आणि तिचा पती यांच्याशिवाय राहू लागली. जेव्हा नाओमीने ऐकले की, याहवेह मोआब येथे त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली. ती ज्या ठिकाणी राहत होती ते तिने सोडले आणि तिच्या दोन सुनांना घेऊन ती त्या मार्गाने निघाली जो त्यांना परत यहूदीया देशाकडे नेत होता. नंतर नाओमी तिच्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघीही तुमच्या आईच्या घरी परत जा. जशी तुम्ही तुमच्या मृत पतींवर आणि माझ्यावर दया दाखविली तशीच याहवेह तुमच्यावर दया करो. याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांची चुंबने घेतली आणि त्या मोठ्याने रडू लागल्या आणि त्या तिला म्हणाल्या, “आम्हीही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे परत जाऊ.” परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील? माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता— तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो. तुमच्यापेक्षा मला हे फारच दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!” त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.” परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.” जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले.