YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 9:27-33

रोमकरांस पत्र 9:27-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल; कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.” त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, “जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो.” तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले; त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”

रोमकरांस पत्र 9:27-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल. कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’ आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे. पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’

रोमकरांस पत्र 9:27-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील. कारण प्रभू त्यांचा दंड पृथ्वीवर वेगाने आणि निर्णयात्मक रीतीने अंमलात आणतील,” यशायाहने आधी म्हटल्याप्रमाणे: “सेनाधीश प्रभूने जर आमचे वंशज वाचविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो आणि गमोरासारखी आमची गत झाली असती.” तर मग आपण काय म्हणावे? गैरयहूदी लोक खर्‍या अर्थाने नीतिमत्वाचा शोध करीत नव्हते, तरी त्यांना विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त झाले. पण नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणारे इस्राएल लोक मात्र ते प्राप्त करू शकले नाहीत. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

रोमकरांस पत्र 9:27-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल; कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.” त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, “जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो.” तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले; त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”

रोमकरांस पत्र 9:27-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल; कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील. हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे: जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था गमोर नगराप्रमाणे झाली असती. तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले. त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे: पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो, लोक त्यावर पडतील. परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही.