YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 9:20-26

रोमकरांस पत्र 9:20-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्‍याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, “जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.” “आणि असे होईल की, ‘तुम्ही माझे लोक नाही’ असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना ‘जिवंत देवाचे पुत्र’ असे म्हणण्यात येईल.”

रोमकरांस पत्र 9:20-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले, आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन. आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’

रोमकरांस पत्र 9:20-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तुने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ” कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व दुसरे सर्वसामान्य उद्देशासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय? परंतु आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे परमेश्वराने ठरविले तर, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे फार सहनशीलतेने सहन करील काय? त्यांनी हे अशासाठी केले की पूर्वीच तयार केलेल्या दयेच्या पात्राला त्यांच्या वैभवाची धनसंपत्ती प्रकट करावी. आम्हाला पण त्यांनी बोलावले, केवळ यहूदीयातूनच नाही तर गैरयहूदीयातूनही नाही का? होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,” आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तेथे त्यांना जिवंत परमेश्वराचे लेकरे असे म्हणतील.”

रोमकरांस पत्र 9:20-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय? होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन आणि असे होईल की, तुम्ही माझे लोक नाही, असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल.