रोमकरांस पत्र 8:6-8
रोमकरांस पत्र 8:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.
रोमकरांस पत्र 8:6-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते, कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत.
रोमकरांस पत्र 8:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.
रोमकरांस पत्र 8:6-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे. देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.