रोमकरांस पत्र 7:23-25
रोमकरांस पत्र 7:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील? मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
रोमकरांस पत्र 7:23-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल? परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.
रोमकरांस पत्र 7:23-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
रोमकरांस पत्र 7:23-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.