YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 7:21-25

रोमकरांस पत्र 7:21-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो. पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी माणूस! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल? परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

रोमकरांस पत्र 7:21-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

रोमकरांस पत्र 7:21-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो. परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.