YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 5:18-21

रोमकरांस पत्र 5:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले. कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील. शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

रोमकरांस पत्र 5:18-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते. कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील. पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली, यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.

रोमकरांस पत्र 5:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.

रोमकरांस पत्र 5:18-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे पुष्कळ जण नीतिमान ठरविले जातील. नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली. तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.