YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 5:18-21

रोमकरांना 5:18-21 MACLBSI

तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे पुष्कळ जण नीतिमान ठरविले जातील. नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली. तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.