रोमकरांस पत्र 4:6-8
रोमकरांस पत्र 4:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की, ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’
रोमकरांस पत्र 4:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा: “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”
रोमकरांस पत्र 4:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’
रोमकरांस पत्र 4:6-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!