रोमकरांस पत्र 3:26
रोमकरांस पत्र 3:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
रोमकरांस पत्र 3:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.
रोमकरांस पत्र 3:26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्याला नीतिमान ठरवणारे असावे.
रोमकरांस पत्र 3:25-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.