रोमकरांस पत्र 2:1-3
रोमकरांस पत्र 2:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
रोमकरांस पत्र 2:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहा, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही. आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. तू सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करतो, पण तीच कृत्ये स्वतः करतोस तर, तू परमेश्वराच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते का?
रोमकरांस पत्र 2:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?
रोमकरांस पत्र 2:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?