रोमकरांस पत्र 16:1-13
रोमकरांस पत्र 16:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की, तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या. यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे. मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत. माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या. ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या. ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या. माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे.
रोमकरांस पत्र 16:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो. मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे. प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा. त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत. त्यांच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला. जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा. माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते. प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा. तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा. अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा. माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या. नार्सिसाच्या घरातील जे प्रभूमध्ये आहेत त्यांना सदिच्छा कळवा. त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले. प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.
रोमकरांस पत्र 16:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो; अशासाठी की, तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे; कारण ती स्वत: पुष्कळ जणांस व मलाही साहाय्य करणारी अशी झाली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.1 त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे. मरीयेला सलाम सांगा; तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय आंप्लियात ह्याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा. माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किससच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा. प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा.
रोमकरांस पत्र 16:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो. तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना शुभेच्छा द्या. त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो, असे नव्हे तर यहुदीतरांच्या सर्व ख्रिस्तमंडळ्याही मानतात. जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे. मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक व सोबतीचे तुरुंगवासी अंद्रोनीक व युनिया ह्यांना शुभेच्छा कळवा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूवरील निष्ठेने माझा प्रिय आंप्लियात ह्याला शुभेच्छा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना शुभेच्छा. ख्रिस्तामध्ये निष्ठावंत ठरलेला अपिल्लेस ह्याला शुभेच्छा. अरिस्तबूलच्या कुटुंबीयांना शुभेच्छा. माझा यहुदी बंधू हेरोदियोन ह्याला शुभेच्छा. नार्किसाच्या कुटुंबातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना शुभेच्छा कळवा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना शुभेच्छा सांगा. प्रिय पर्सिस हिला शुभेच्छा द्या. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत. प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा.