YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 16:1-13

रोमकरांना 16:1-13 MACLBSI

किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो. तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना शुभेच्छा द्या. त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो, असे नव्हे तर यहुदीतरांच्या सर्व ख्रिस्तमंडळ्याही मानतात. जी ख्रिस्तमंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही माझा नमस्कार कळवा. माझा प्रिय अपैनत ह्याला शुभेच्छा. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे. मरियेला शुभेच्छा, तिने तुमच्यामध्ये फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक व सोबतीचे तुरुंगवासी अंद्रोनीक व युनिया ह्यांना शुभेच्छा कळवा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूवरील निष्ठेने माझा प्रिय आंप्‍लियात ह्याला शुभेच्छा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना शुभेच्छा. ख्रिस्तामध्ये निष्ठावंत ठरलेला अपिल्लेस ह्याला शुभेच्छा. अरिस्तबूलच्या कुटुंबीयांना शुभेच्छा. माझा यहुदी बंधू हेरोदियोन ह्याला शुभेच्छा. नार्किसाच्या कुटुंबातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना शुभेच्छा कळवा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना शुभेच्छा सांगा. प्रिय पर्सिस हिला शुभेच्छा द्या. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत. प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा.