रोमकरांस पत्र 14:2-4
रोमकरांस पत्र 14:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. जो खातो त्याने न खाणार्यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
रोमकरांस पत्र 14:2-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु ज्याचा विश्वास दुर्बळ तो शाकभाजीच खातो. जो कोणी सर्वकाही खातो त्याने न खाणार्याला तुच्छ ठरवू नये, आणि जो कोणी सर्वकाही खात नाही त्याने खाणार्याचा न्याय करू नये; कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे. दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
रोमकरांस पत्र 14:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणार्याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसर्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
रोमकरांस पत्र 14:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बल शाकाहारी अन्न खातो. जो सर्व काही खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.