रोमकरांस पत्र 12:20-21
रोमकरांस पत्र 12:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास करशील.” वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक.
रोमकरांस पत्र 12:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
रोमकरांस पत्र 12:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास कराल.” वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.
रोमकरांस पत्र 12:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.