रोमकरांस पत्र 12:17-19
रोमकरांस पत्र 12:17-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
रोमकरांस पत्र 12:17-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा. माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; आणि मी परतफेड करीन,” असे प्रभू म्हणतात.
रोमकरांस पत्र 12:17-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.
रोमकरांस पत्र 12:17-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, असे प्रभू म्हणतो.