रोमकरांस पत्र 12:14-18
रोमकरांस पत्र 12:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा. एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
रोमकरांस पत्र 12:14-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा; रडणार्यांबरोबर रडा. एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका. वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा.
रोमकरांस पत्र 12:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
रोमकरांस पत्र 12:14-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.