YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 1:5-8

रोमकरांस पत्र 1:5-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण हे मिळाले आहेत; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे. तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. रोममधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वराची प्रीती आहे आणि ज्यांना पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर आपला पिता व येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो. प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

रोमकरांस पत्र 1:5-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. ह्या लोकांमध्ये तुमच्या रोममधील श्रद्धावंतांचाही समावेश होतो कारण तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. म्हणून रोममधील तुम्हां श्रद्धावंतांना मी लिहीत आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने त्याची प्रजा होण्यासाठी तुम्हांला आमंत्रित केले आहे. त्या तुम्हांला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती मिळो. पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.