रोमकरांस पत्र 1:18-20
रोमकरांस पत्र 1:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
रोमकरांस पत्र 1:18-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे अनीतिने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो, परमेश्वराविषयी जे कळले पाहिजे ते त्यांना प्रकट झाले आहे; स्वतः परमेश्वरानेच त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कसलेही सबब राहिले नाही.
रोमकरांस पत्र 1:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.
रोमकरांस पत्र 1:18-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे. परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये!