YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 5:5-10

प्रकटी 5:5-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.” राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”

सामायिक करा
प्रकटी 5 वाचा

प्रकटी 5:5-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदा वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.” मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठवलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत. कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्यांनी ती गुंडाळी घेतली. कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एक एक वीणा आणि सोन्याची धूपपात्रे होती. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द हे असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंशातून, भाषेतून, आणि राष्ट्रातून लोक विकत घेतले, तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहेस; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

सामायिक करा
प्रकटी 5 वाचा

प्रकटी 5:5-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.” तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत. त्याने जाऊन ‘राजासनावर जो बसलेला’ होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत. ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.”

सामायिक करा
प्रकटी 5 वाचा

प्रकटी 5:5-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.” तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”

सामायिक करा
प्रकटी 5 वाचा