तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.” तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”
प्रकटी 5 वाचा
ऐका प्रकटी 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 5:5-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ