प्रकटी 4:9-11
प्रकटी 4:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”
प्रकटी 4:9-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे राजासनावर बसलेले आहे आणि जे युगानुयुग जिवंत आहे, त्यांचा त्या सजिव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली, त्या त्या वेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले: “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; कारण तुम्ही सर्व निर्माण केले. तुमच्याच इच्छेने सर्वकाही अस्तित्वात आले.”
प्रकटी 4:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”
प्रकटी 4:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याला जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व आभार व्यक्त करणारी गाणी गातात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, “प्रभो, आमच्या देवा ! गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस कारण तू सर्वांना निर्माण केले व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”