प्रकटी 22:13-15
प्रकटी 22:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे. आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.
प्रकटी 22:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत. परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”
प्रकटी 22:13-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.
प्रकटी 22:13-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटचा, आदी व अंत आहे.” आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य! विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.