प्रकटी 15:3-4
प्रकटी 15:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’ ‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’
प्रकटी 15:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.
प्रकटी 15:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते परमेश्वराचा सेवक मोशे याचे आणि कोकर्याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत! हे प्रभू, तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही, असा कोण आहे? कारण तुम्हीच पवित्र आहा! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”
प्रकटी 15:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? तूच एकमेव पवित्र आहेस. सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुझी आराधना करतील, कारण तुझी न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”