स्तोत्रसंहिता 95:3-7
स्तोत्रसंहिता 95:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली. याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू; कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
स्तोत्रसंहिता 95:3-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत; समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत. पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत. समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे. या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू; कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.
स्तोत्रसंहिता 95:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला; कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!