स्तोत्रसंहिता 90:9-12
स्तोत्रसंहिता 90:9-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात. आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो. तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
स्तोत्रसंहिता 90:9-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो. आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.