स्तोत्रसंहिता 90:13-17
स्तोत्रसंहिता 90:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर. तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. जेवढे दिवस तू आम्हांला पिडले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हांला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.
स्तोत्रसंहिता 90:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर. तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू. जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे. प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.