स्तोत्रसंहिता 86:3-7
स्तोत्रसंहिता 86:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो. हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
स्तोत्रसंहिता 86:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे प्रभू, माझ्यावर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या काकळुतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.