स्तोत्रसंहिता 78:70-72
स्तोत्रसंहिता 78:70-72 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले. दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
स्तोत्रसंहिता 78:70-72 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली. आणि दावीदाने प्रामाणिक अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले; कुशल हातांनी त्याने त्यांचे नेतृत्व केले.
स्तोत्रसंहिता 78:70-72 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने आपला सेवक दावीद ह्याला निवडले; त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले; आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले. आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.