स्तोत्रसंहिता 78:29-32
स्तोत्रसंहिता 78:29-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले. पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते. त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले. इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचास्तोत्रसंहिता 78:29-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली. त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती, अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता, तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले, इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले, व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचा