YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 78:17-21

स्तोत्रसंहिता 78:17-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. रानात परात्पराविरूद्ध बंड केले. नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले. ते देवाविरूद्ध बोलले, ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का? पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?” जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला

स्तोत्रसंहिता 78:17-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले. ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी स्वेच्छेने आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा घेतली. ते परमेश्वराच्या विरोधात बोलले; ते म्हणाले, “परमेश्वर खरोखर वाळवंटात मेज लावू शकतात का? खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?” जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले; त्यांचा अग्नी याकोबाविरुद्ध पेटला, आणि त्यांचा क्रोध इस्राएलावर भडकला.

स्तोत्रसंहिता 78:17-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तथापि ते त्याच्याविरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले, परात्पराविरुद्ध रुक्ष अरण्यात त्यांनी बंड केले. त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली. ते देवाविरुद्ध बोलले; ते म्हणाले, “रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय? पाहा, त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले, व त्याचे लोट चालले; तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरवील काय?” हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोबावर त्याचा अग्नी पेटला; इस्राएलावर त्याचा क्रोध भडकला.