स्तोत्रसंहिता 78:13-16
स्तोत्रसंहिता 78:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले. तो त्यांना दिवसा मेघ व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे. त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले. त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.
स्तोत्रसंहिता 78:13-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले. दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत. त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले.
स्तोत्रसंहिता 78:13-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले. दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे. त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले. त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले.