YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 55:12-23

स्तोत्रसंहिता 55:12-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्‍हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणार्‍यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे; माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील; तोच अनादि कालापासून राजासनारूढ आहे. (सेला) कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला; त्याने आपला करार मोडला;1 त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते. तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.

स्तोत्रसंहिता 55:12-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त. एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो. मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. मी तर देवाला हाक मारीन, आणि परमेश्वर मला तारील. मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते. देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत. माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. त्याने आपला करार मोडला आहे. त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही. परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.

स्तोत्रसंहिता 55:12-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र, जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता. मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो; ते जिवंतच अधोलोकात उतरले जावोत, कारण त्यांच्या घरात, त्यांच्या आत्म्यात दुष्टपणा आहे. मी तर परमेश्वराचा धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील. संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी मी वेदनांनी आरोळी देईन आणि ते माझी वाणी ऐकतील. जरी माझे बरेच विरोधक तिथे होते, जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते, तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात. परमेश्वर प्राचीन काळापासून राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत— ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील, कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे. त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते. तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही. परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना नाशाच्या गर्तेत लोटून द्याल; खुनी आणि लबाड लोक त्यांचे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत.